Goa live news in Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: सालिस फर्नांडिस यांनी साकारला 'मूव्हिंग ख्रिसमस क्रिब'

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

सालिस फर्नांडिस यांनी साकारला 'मूव्हिंग ख्रिसमस क्रिब'

ख्रिसमसच्या उत्सवा निमित्त गोव्याच्या कानाकोपऱ्यात गोठे साकारले जात असताना, साळगाव येथील अवर लेडी ऑफ रोझरी चॅपलमध्ये एक अत्यंत कलात्मक आणि फिरत्या यंत्रणेवर आधारित ख्रिसमस क्रिब उभारण्यात आला आहे. स्थानिक कलाकार सालिस फर्नांडिस यांनी आपल्या कल्पकतेतून ही कलाकृती साकारली आहे.

काणकोणच्या भूजलात धातूंचे घातक प्रदूषण

दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील खोतीगाव आणि गावडोंगरी या दोन पंचायतींच्या क्षेत्रातील भूजलामध्ये धातूंचे प्रदूषण उच्च पातळीवर असल्याचे एका अलीकडील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या भागातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (Borewells) पाण्याचे नमुने तपासल्यानंतर, त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक ठरतील अशा धातूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.

"दूध आणि अंडी सोडा, 'विगन' बना"; प्राण्यांच्या रक्षणासाठी पणजीमध्ये 'ॲनिमल लिबरेशन मार्च'

प्राण्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या जगण्याच्या अधिकाराचा प्रचार करण्यासाठी गोव्याच्या राजधानीत 'गोवा ॲनिमल लिबरेशन मार्च' काढण्यात आला. 'लिबरेशन फॉर ऑल' या छत्राखाली एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गोवेकरांना 'विगन' जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आयएनएस हंसावर 'गार्ड ऑफ ऑनर'

भारताच्या माननीय राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलांच्या सर्वोच्च कमांडर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज वास्को येथील आयएनएस हंसा या नौदल तळाला भेट दिली. याप्रसंगी भारतीय नौदलाच्या तुकडीतर्फे त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

राष्ट्रपतींच्या आगमनानंतर नौदलाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. राष्ट्रपतींनी या संचलनाची बारकाईने पाहणी केली आणि जवानांच्या शिस्तीचे कौतुक केले. या सोहळ्याला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

'GMC'च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मारली बाजी; 'IMA MSN' गोवा टीमला 4 राष्ट्रीय पुरस्कार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील 'IMA MSN Awards 2025' मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सूर्यम सिंग, दिव्या गावडे, पार्थ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटाने गोव्याचे प्रतिनिधित्व करताना एकूण ४ राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

दिग्गजांच्या हस्ते गौरव: या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान 'आयएमए'चे (IMA) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला मावळते अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन, मानद सरचिटणीस डॉ. शर्बरी दत्ता आणि मानद वित्त सचिव डॉ. पीयूष जैन यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Protest: '..आमचो गळो चिरलो'! युनिटी मॉलविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक; आंदोलक बसले उपोषणाला Video

Goa Education: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी! गोव्यात नववीचे पेपर आता शाळाच काढणार; बोर्डाचा जुना निर्णय मागे

Gajkesari Rajyog 2026: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नशिबाची साथ! 'गजकेसरी राजयोग' उजळणार 'या' राशींचे भाग्य; आत्मविश्वास वाढणार, कामे फत्ते होणार

Gautam Gambhir: मोठी बातमी! 'गौतम गंभीर'चे प्रशिक्षकपद जाणार? या खेळाडूला झाली विचारणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

'सेफ गोवा, हॅप्पी गोवा!' 5 लाख पर्यटकांची महागर्दी; नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याचे किनारे पर्यटकांनी ओसंडून वाहणार

SCROLL FOR NEXT