Goa live news Dainik Gomantak
गोवा

Goa News: दक्षिण गोव्यात 'SIR' पडताळणी मोहिमेत मतदारांचा प्रचंड गोंधळ

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी; राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर बातम्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याचे सुपुत्र न्यायमूर्ती महेश सोनक झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश!

गोव्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी (२ जानेवारी २०२६) याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली.

विद्यमान मुख्य न्यायाधीश तरलोक सिंह चौहान हे ८ जानेवारी रोजी वयाची ६२ वर्षे पूर्ण करून निवृत्त होत आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती सोनक आपला पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती जी. डी. कामत आणि न्यायमूर्ती फर्दिनो रेबेलो यांच्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषवणारे ते तिसरे गोमंतकीय ठरणार आहेत.

करंझाळे येथील मासे खाणे आरोग्यास घातक; गोवा विद्यापीठाचा इशारा

करंझाळे  किनाऱ्यावरील मासे खाणाऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. गोवा विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनात या भागातील माशांमध्ये 'हेवी मेटल्स'चे (जड धातू) प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.

'गोवामाइल्स' आणि स्थानिक टॅक्सी चालकांमधील वाद मिटवा; मायकल लोबो

या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यातील एका ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. "या वर्षात सर्वात आधी सोडवण्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 'गोवामाइल्स' (GoaMiles) आणि स्थानिक टॅक्सी चालक यांच्यातील सुरू असलेला संघर्ष," असे विधान लोबो यांनी केले आहे.

वाडी-तळावलीत रस्ते अपघात; पादचारी तरुणीला कारची धडक!

फोंडा तालुक्यातील वाडी-तळावली येथे शुक्रवारी संध्याकाळी एका भरधाव कारने रस्त्यावरून चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणीला जोराची धडक दिली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बायणा किनाऱ्याचा कायापालट: 'रेडलाईट' ते 'लाईमलाईट'; आता वॉटर स्पोर्ट्सचे प्रमुख केंद्र!

"एकेकाळी गुन्हेगारी आणि बदनाम वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बायणा समुद्रकिनाऱ्याचे आता गोव्यातील एका प्रमुख पर्यटन स्थळात रूपांतर झाले आहे," असे प्रतिपादन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केले आहे. बैणा किनारा आता 'रेडलाईट' वरून 'लाईमलाईट'मध्ये आला असून, तो वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांचा 'मास्टरप्लॅन'

गोव्याच्या राजकारणात आगामी विधानसभा अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली असून, ३ जानेवारी रोजी सर्व विरोधी आमदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे.

पर्वरीतील चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघड

पर्वरी येथील पीडीए कॉलनी परिसरात डिसेंबर महिन्यात झालेल्या साखळी चोरीचा छडा लावण्यात सळगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल रहमान (३२ वर्षे, रा. उत्तराखंड) याला अटक केली आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये ऐतिहासिक वाढ

गोवा मेडिकल कॉलेजमधील (GMC) निवासी डॉक्टरांची संघटना 'GARD' च्या प्रतिनिधींनी नुकतीच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन, विद्यावेतनात (Stipend) केलेल्या ऐतिहासिक वाढीबद्दल त्यांचे आभार मानले. ही भेट अत्यंत सकारात्मक झाली असून, डॉक्टरांच्या कल्याणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे

दक्षिण गोव्यात 'SIR' पडताळणी मोहिमेत मतदारांचा प्रचंड गोंधळ

दक्षिण गोव्यातील विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेदरम्यान मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda Accident: 'हिट ॲण्ड रन'मुळे फोंड्यात दोघे जखमी, एकजण ताब्यात; एक वाहनचालक पसार

Sindhudurg Chipi Airport: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'नाईट लँडिंग'ची मंजुरी! आता 24 तास विमानसेवा शक्य

Gurim Car Accident: गिरी हायवेवर थरार! चुकीच्या लेनमधून आलेल्या 'इन्व्होव्हा'ने दोन गाड्यांना उडवले

Chorao Island: कोटी वर्षांपूर्वी मांडवीच्या पात्रातही चार बेटे होती, 450 वर्षापूर्वीच्या मोडतोडीचा इतिहास; संस्कृती हरवत चाललेले 'चोडण बेट'

इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे 15 जणांचा मृत्यू! तुम्ही पित असलेलं पाणी खरचं शुद्ध आहे का? 'असं' तपासा घरच्या घरी

SCROLL FOR NEXT