Live Updates

Goa News Updates: भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Updates: जाणून घ्या गोव्यातल्या ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भूतानी प्रकल्पाच्या मुद्यावरुन रान उठलं आहे. सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत भूतानी प्रकल्पाला दिलेली मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका नाईकांनी घेतली आहे. यातच आता, भूतानीविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात एकजूटीने लढण्याची गरज यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलिनकरांनी बोलून दाखवली.

नोकरी देण्याच्या आमिषाने 15 लाख लाटल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी अटकेत!

शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सागर सुरेश नाईक ( कुर्टी, फोंडा) या पोलिस खात्याच्या कर्मचाऱ्याला फोंडा पोलिसांकडून अटक

कोलवा ग्रामसभेतं भाडेकरु पडताळणी मोहीमेसह विविध विषयांवर चर्चा

कोलवा ग्रामसभेने अनेक विषयांवर चर्चा केली, ज्यामध्ये एनजीओचे ऑडिट, नवीन पंचायतीचं ठिकाण, शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या विषयांचा समावेश होता. याशिवाय, सोनाबाटी रोडवरील अवजड वाहतूक, भाडेकरु पडताळणी आणि औषध व्यावसायिकांचे नियमन याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. रोमी कोंकणीला समान दर्जा मिळावा या मागणीसह ग्रामसभेने कॅशलेस सुविधा, निवडून आलेल्या सदस्यांसाठी वाढीव पगार आणि अतिक्रमण विरोधात उपायही सुचवले.

म्युझिक फेस्टिव्हलबाबात हणजूणवासीयांचा मूक मोर्चा!

हणजूण येथे सनबर्नसारख्या फेस्टिव्हलच्या विरोधात ग्रामस्थांनी आज (27 ऑक्टोबर) मूक मोर्चा काढला. ग्रामस्थांनी यावेळी अशा पेस्टिव्हलबाबत चिंता व्यक्त केली. अशा फेस्टिव्हलमुळे गावातील शांतता भंग होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

अडवलपाल पंचायतीच्या ग्रामसभेत खाण मुद्दा तापला; ग्रामस्थ नाराज

अडवलपाल पंचायतीच्या ग्रामसभेत खाण मुद्दा तापला. 'फोमेंतो' खाणीला दिलेली 'एनओसी' मागे घ्या. लोकांची मागणी. सरपंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ नाराज.

अखेर 'त्या' पोलील कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला!

शुक्रवारी झुआरी पूलावरुन उडी मारलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह मुरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुआरी नदीत सापडला.

अनिर्बंध खनिज व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रात; मयेतील ग्रामस्थ भडकले

अनिर्बंध खनिज व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रात. मये पंचायतीच्या ग्रामस्थांचा आरोप.

नागालँडविरुद्ध गोव्याची 32 धावांची आघाडी

रणजी ट्रॉफी प्लेट विभागीय क्रिकेट सामन्यात गोव्याने नागालँडवर 32 धावांनी आघाडी घेतली आहे. 179 धावांच्या प्रत्युत्तरात नागालँडने पहिल्या डावात सर्वबाद 147 धावा केल्या.

पर्यटन हंगाम सुरळीत कर रे महाराजा!

दूधसागर हंगामाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करुन सर्व काही सुरळीत होण्यासाठी स्थानिकांकडून दूधसागर देवाला सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG 4th Test: अभिनंदन केएल राहुल! इंग्लंडमध्ये केला पुन्हा नवा पराक्रम; 'या' दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT