Goa Crime Dainik Gomantak
Live Updates

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Goa Updates Marathi: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात डिचोली पोलिस स्थानकात गुन्हा नोंद. शिक्षकाला नोटीस जारी.

मुख्यमंत्र्यांनी 2027 पर्यंत कुडचिरेत 2 चांगले प्रकल्प आणून दाखवावेत; गोवा फॉरवर्डचं खुलं आवाहन

मये मतदारसंघाला दरवेळी गृहीत धरले जाते. आमदारांनी पत्रकार परिषदेत दिलेलं आश्वासन लेखी स्वरुपात गावकऱ्यांना द्यावे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सारख्या चांगल्या प्रकल्पांना गावकरी विरोध करणार नाही पण कचरा प्रकल्प नको. मुख्यमंत्र्यांनी 2027 पर्यंत कुडचिरे गावात 2 चांगले प्रकल्प आणून दाखवावेत- गोवा फॉरवर्ड उत्तर गोवा सचिव संतोषकुमार सावंत

गोवा कॉंग्रेसच्या फायरब्रॅंड नेत्या मनिषा उसगावकरांचा दिल्लीत सन्मान

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेस सदस्य नोंदणीसाठी कॉंग्रेसच्या फायरब्रांड नेत्या मनिषा उसगावकर यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल अखिल भारतीय महिला कॉंग्रेस अध्यक्ष अलका लांबा यांच्याकडून सन्मान.

विश्वजित राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

25 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच, राज्याच्या विकासावर चर्चा केली.

उसगावांत अपघात, चालक जखमी!

उसगांव तिस्क गावकर वाडा येथे ओमनी गाडीचा भीषण अपघात. चालक जखमी. अग्नीशामक दल व पोलिस घटनास्थळी दाखल.

तस्कर गोव्यात लपून बसणार नाहीत याची खात्री करणार सरकार!

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आपल्याला लैंगिक तस्करीपासून सावध राहण्याची गरज आहे. गोव्यात कोणतेही लैंगिक तस्कर लपून बसणार नाहीत याची खात्री सरकार करेल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लैंगिक तस्करीतून सुटका झालेल्या लोकांना रोजगार मिळावा; आमदार दिलायला लोबो

लैंगिक तस्करीतून सुटका झालेल्या इतर राज्यातील व्यक्तींना त्यांच्याच राज्यात रोजगार मिळावा. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, त्यांनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव सादर करावा: आमदार दिलायला लोबोंचे प्रतिपादन.

गोवा-चोर्ला मार्गावर अपघात; सुदैवाने जीवीतहानी टळली

गोवा-चोर्ला मार्गावर पर्ये येथे अवजड मालवाहू ट्रक कलंडला. सुदैवाने जीवीतहानी टळली. सदर ट्रक बेळगावहून गोव्यात येत होता.

कुडचिरेतील वादग्रस्त प्रकल्प रद्द!

लोकभावनेचा आदर राखून कुडचिरेतील प्रस्तावीत प्रकल्प रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आणि पंचायत मंडळ तसेच नागरिकांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) रोजी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सदर माहिती दिली.

मडगावात सशस्त्र व्यक्तींनी दाखवला बंदुकीचा धाक

मडगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत, सशस्त्र व्यक्तींनी एका नागरिकाला बंदुकीचा धाक दाखवून तो आपल्या मुलाला शाळेत सोडून परतत असताना धमकावले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

गोव्यात 'बंटी-बबली'चा धुमाकूळ, बनावट कागदपत्रांद्वारे घातला गंडा!!

कुख्यात ‘बंटी-बबली’ जोडप्याविरोधात कारवाई करताना वाळपई पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून ४४ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. विदिशा आणि विजयनाथ गावडे अशी त्‍यांची नावे आहेत. हे जोडपे डिचोली आणि दोडामार्ग येथे मालमत्ता खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून गुंतवणूकदारांना फसवत होते. त्‍यांच्‍याकडून सोने घेत होते. चेक किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे ते विश्‍‍वास संपादन करायचे व नंतर मालमत्ता सोडाच, पैसेही देत नसत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT