Live Updates

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

Live Marathi News 18 November 2024: कॅश फॉर जॉब स्कॅम, सेंट झेवियर शव प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि गोव्यातील इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण!

गोवा सहकार क्षेत्रात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा. डॉ. दत्ताराम भास्कर देसाई यांना गोवा सहकार भूषण तर प्रतिमा धोंड यांना सहकार श्री पुरस्कार जाहीर. सहकार रत्न पुरस्काराला एकही नाव न आल्याने सहकार रत्न पुरस्कार यंदा दिला जाणार नाही. तसेच गौरी शिरवईकर आणि गोविंद नाईक यांना व्यक्तिगत पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

पंतप्रधान कार्यालयात (PMO) सुरक्षा प्रभारी असल्याच्या आरोपावरून शिरंग मनेश जावळ याच्याविरुद्ध कळंगुट पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर गोव्यातील टॅक्सी चालकांची खोटी बतावणी करून फसवणूक केल्याचा आरोप असून पुढील तपास सुरु आहे.

GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

गोवा मेडिकल कॉलेजमधल्या फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यानुसार आता फिजिओथेरपीच्या जागांमध्ये 100 टक्के वाढ करण्यात आली आहे.

तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

नेस्ले कंपनीजवळ रात्री 12:30 वाजताच्या सुमारास एक दुचाकी व कंटेनर यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवराज पाटील याच्या दोन्ही पायाला गंभीर जखम झाल्याने त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

फोंडा पोलिसांनी गुरुवारी (15 नोव्हेंबर) रोजी उसगाव-तिस्क इथे झालेल्या बाल-विवाहामधून अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणामध्ये मुलीच्या वडिलांसह इतर चार जणांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

SCROLL FOR NEXT