सनातन राष्ट्रतर्फे २२-२५ मे दरम्यान आयोजित शंखनाद महोत्सवानंतर गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, फर्मागुडी परिसरात साचलेला कचरा अजूनही साफ करण्यात आलेला नाही. एक महिना उलटूनही परिसरात कचऱ्याचे ढीग तसेच पडून आहेत, प्रशासनाकडून दुर्लक्ष
पर्ये सत्तरी येथे पार्किंगच्या किरकोळ वादातून अनिकेत सिंगबाळ याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी, न्यायालयाने योगेश राणे याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
र्ये सत्तरी येथील मॅनेजमेंट कॉलेज जवळ योगेश राणे आणि अनिकेत सिंगबाळ यांच्यात झालेल्या वादात योगेश राणे यांनी अनिकेत यांच्यावर धारदार शस्त्राने केला हल्ला. यात अनिकेत जखमी झाला असून आता त्याची प्रकृती चांगली आहे. योगेश याला वाळपई पोलिसांनी केले अटक. या प्रकरणाचा तपास psi प्रथमेश गावस करत आहे.
कासवाडा- तळावली येथील पार्वती नाईक आणि नरसिंह नाईक यांच्या घरावर वडाचे झाड कोसळलेल्या ठिकाणी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी. दोन्ही घरे दुरुस्त करण्याचे दिले आश्वासन
- आमच्यामधील अंतरपाट दूर केलाय अनाजीपंतांनी.
- आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी
- भाजपचे वापरा आणि फेकून द्या हे तंत्र, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून दे
राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद.सहा चाकी व चार चाकीना प्रवेश चालु.अवजड वाहने कारवार व चोर्ला मार्गे सोडणार असल्याची उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी दिली माहिती
कासवाडा- तळावली येथील पार्वती नाईक आणि नरसिंह नाईक यांच्या घरावर कोसळले वडाचे झाड. रात्री २ वाजण्याची घटना असून त्यावेळी दोन्ही घरात कोणीच नसल्याने दुर्घटना टळली.
मुसळधार पावसाचा पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसराला फटका बसला असून, या भागात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. विद्युत बिघाड आणि ओपा येथे पाईपलाईन दुरस्तीच्या कामामुळे देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पिण्याचे पाणी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता अखेर शुक्रवारी रात्री खचला. यामुळे मार्गावरुन वाहतूक करणे आता धोक्याचे झाले आहे. दूधसागर मंदिराच्या जवळच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या, खबरदारी म्हणून या भागात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. अखेर रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.