Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: या 5 भारतीय खेळाडूंनी T20 विश्वचषकात मारले सर्वाधिक षटकार, वाचा

T20 World Cup 2022, Team India: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक 2022 चा थरार सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022, Team India: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक 2022 चा थरार सुरु झाला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये चाहत्यांना अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 5 भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. यातील केवळ 2 खेळाडू यावेळी टीम इंडियाचा भाग आहेत.

दरम्यान, भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग हा T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज आहे. युवराजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 33 सामने खेळले आहेत. त्याने एका सामन्यात 6 चेंडूत 6 षटकारही मारले आहेत. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने T20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 31 षटकार ठोकले आहेत. तो यावर्षी युवराज सिंगचा 33 षटकारांचा विक्रम मोडू शकतो.

तसेच, या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने T20 विश्वचषकात 21 सामने खेळताना 20 षटकार ठोकले आहेत. जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, एमएस धोनीने टी-20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 16 षटकारही ठोकले आहेत.

शिवाय, टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या सुरेश रैनाचाही या यादीत समावेश आहे. रैनाने T20 विश्वचषकातील 26 सामन्यांमध्ये 12 षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT