Rohit Sharma Fan invades Pitch Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनचं मोठ्ठं मन! सुरक्षा कडं भेदत मैदानात आलेल्या युवा चाहत्यासाठी केलं असं काही...

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान रोहित शर्माला भेटायला लहान मुलगा सुरक्षा तोडत मैदानात आला होता.

Pranali Kodre

India vs New Zealand: रायपूरला शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना झाला. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा फलंदाजी करत असताना एक लहान मुलगा अचानक मैदानात आला. पण त्यानंतर रोहितने केलेल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.

ही घटना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजी करत असताना 10 व्या षटकादरम्यान घडली. या षटकाच्या चौथ्या चेंडूवेळी एक मुलगा अचानक मैदानात आला. त्याने मैदानात येत रोहितला मिठी मारली.

त्यावेळी त्या चाहत्यांच्या मागे लगेचच सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी चाहत्याला रोहितपासून दूर करत मैदानाबाहेर नेले. पण यावेळी रोहितने त्या मुलाच्या विरोधात कोणतीही कारवाई न करण्याची विनंती सुरक्षा रक्षकांकडे केली. त्याने त्याच्या दाखवलेल्या या उदारपणाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, रोहित शर्माने भारताकडून न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 50 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तसेच त्याने सलामीला शुभमन गिलबरोबर 72 धावांची भागीदारी केली.

शुभमन गिलनेही या सामन्यात चांगली कामगिरी करताना नाबाद 40 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 20.1 षटकात 2 बाद 111 धावा करत हा सामना सहज जिंकला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्या 5 विकेट्स केवळ 15 धावांत गमावल्या होत्या.

पण नंतर ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल यांनी 41 धावांची आणि फिलिप्स आणि मिशेल सँटेनर यांनी 47 धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. हे तिघे बाद झाल्यावर न्यूझीलंडचा डाव 34.3 षटकात 108 धावांवरच संपला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT