Arjun Tendulkar
Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar च्या अर्जुनसाठी युवराजच्या वडिलांचा गुरुमंत्र आला कामी; 'अशी' करून घेतली ट्रेनिंग

Pranali Kodre

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने मंगळवारी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने गोव्याकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून हे पदार्पण केले. महत्त्वाचे म्हणजे त्याने त्याच्या पदार्पणातच शतकी खेळीही केली. याबरोबरच त्याने त्याचे वडील सचिन तेंडुलकरच्या पहिल्या रणजी सामन्यात शतक करण्याच्या विक्रमाशीही बरोबरीही केली.

दरम्यान, त्याच्या या कामगिरीमागे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचेही मोठे योगदान आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भारताचा देशांतर्गत हंगाम सुरू होण्याआधी अर्जुनला जवळपास दोन आठवडे ट्रेनिंग दिले होते.

तसेच रिपोर्ट्सनुसार त्यांनी अशीही भविष्यवाणी केली आहे की एकदिवस अर्जुन महान अष्टपैलू ठरेल आणि त्यांचे हे शब्द खरे ठरतील.

त्याचबरोबर अर्जुनच्या पहिल्या रणजी शतकानंतर योगराज इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, 'सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात मला युवीचा कॉल आला होता. त्याने मला सांगितले होते की डॅड, अर्जुन दोन आठवड्यांसाठी चंदीगढ़मध्ये राहिल आणि सचिनने सांगितले आहे की तुम्ही त्याला ट्रेन करा.'

'मी युवराजला म्हणालो, सचिनला मी कसा नकार देईल, तो माझ्या मोठ्या मुलासारखा आहे. पण माझी एक अट आहे, तुला माहित आहे की मी कशाप्रकारे ट्रेनिंग देतो. मला ट्रेनिंगच्या दरम्यान कोणाचाही हस्तक्षेप नको.'

तसेच योगराज यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन ट्रेनिंगच्या वेळी 5 वाजता उठून 2 तासाच्या रनिंगनंतर जीम करायचा. योगराज यांनी सांगितले की, 'मी अर्जुनला सांगितले की 15 दिवस तू हे विसरून जा की तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. तुला तुझ्या वडिलांच्या छायेतून बाहेर यावे लागेल.'

'त्यानंतर नेट्समध्ये मला प्रभावित केले. पण तो मला त्याच्या वेगाने प्रभावित करू शकला नाही. पण मी जेव्हा त्याची फलंदाजी पाहिली, तर ती शानदार होती. मला वाटते की तो आक्रमक फलंदाज होऊ शकतो. मी याबद्दल लगेचच युवराज आणि सचिनला सांगितले होते.'

यापूर्वीच सप्टेंबरमध्ये अर्जुन योगराज यांच्याकडून ट्रेनिंग घेतानाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. त्यावेळी अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्याचबरोबर या ट्रेनिंग दरम्यान योगराज आणि अर्जुनचा भांगडा करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता.

युवराज-सुयशची दमदार कामगिरी

राजस्थानविरुद्ध गोव्याकडून खेळताना पहिल्या डावात सुयश प्रभुदेसाईने 212 धावांची खेळी केली. तसेच अर्जुनने 120 धावांची खेळी केली. त्याचबरोबर या दोघांनी 6 व्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे गोव्याने 9 बाद 547 धावांवर पहिला डाव घोषित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT