Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Margao News : बेरोजगारी आणि घरांना तडे जाण्याच्या मुद्यांकडे दुर्लक्ष; युरी आलेमाव यांनी वास्कोचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही भागाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जारी केला आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News :

मडगाव, वास्कोचे भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजप सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे वास्कोतील रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत आरसा दाखवला.

त्यांनी सलग पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारी आणि घरांना तडे जाण्याच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक आमदारांच्या भाषणावरून स्पष्ट होते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वास्को येथील प्रचार सभेत वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ ​​दाजी साळकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना बेरोजगारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी भाजपवर टीका केली. युरी आलेमाव यांनी वास्कोचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही भागाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जारी केला आहे.

माझे विधानसभेतील सहकारी दाजी साळकर यांच्या भाषणातून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही घरांमध्ये तडे जाण्याच्या आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी वारंवार केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कबूल केले की स्थानिक आमदारांना त्यांचे सदर मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी निवडणूक सभा तडे गेलेल्या व बेरोजगारीचा त्रास सहन करणाऱ्यांच्या घराशेजारीच घेण्यास भाग पाडले गेले, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोमंतकीयांनी भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दाखवलेल्या आरशातील भाजपचा खरा चेहरा समजून घ्यावा. भाजपने गेल्या दहा वर्षांत केलेल्या सर्व गैरकृत्यांमुळे त्यांचा पराभव करण्याची वेळ आता आली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

तडे गेलेल्या घरांना भेट दिली नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या २ वर्षांत ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांना भेट देण्याची तसदी घेतली नाही, ही धक्कादायक बाब आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून स्थानिक तरुणांवर होणाऱ्या अन्यायाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. भाजपच्या कारभाराचा खरा चेहरा समोर आला, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.

Yuri Alemao
Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

‘अंत्योदय नारा उघडा पडला’

भाजप केवळ निवडणुकीच्या वेळीच लोकांपर्यंत जातो हे यावरून दिसून येते. अन्यथा त्यांना नागरिकांच्या त्रासाची आणि सुरक्षिततेच्या समस्यांबद्दल चिंता नसते. वास्कोच्या आमदाराच्या खुलाशामुळे भाजपचा अंत्योदय नारा उघडा पडला आहे. भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com