Big Show weight loss Dainik Gomantak
क्रीडा

Weight Loss: ना कुठलं औषध, ना कुठलीही सर्जरी... WWE दिग्गज 'बिग शो'ने तब्बल 52 किलो वजन केलं कमी, सीक्रेट आलं समोर

Big Show weight loss secret: जागतिक कुस्तीतील प्रसिध्द खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाणारा 'बिग शो' (Big Show) सध्या आपल्या जबरदस्त शारीरिक बदलामुळे चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

जागतिक कुस्तीच्या (Wrestling) इतिहासातील सर्वात महाकाय खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाणारा 'बिग शो' (Big Show) सध्या आपल्या जबरदस्त शारीरिक बदलामुळे (Body Transformation) चर्चेत आला आहे. एकेकाळी २३० किलो वजनाचा हा डोंगर आता चक्क १८० किलोच्या खाली आला आहे. रिंगमध्ये शेवटच्या एका महामुकाबल्यासाठी त्याने घेतलेली ही मेहनत पाहून त्याचे जगभरातील चाहते अवाक झाले आहेत.

निवृत्तीपूर्वी शेवटच्या लढतीची तयारी

बिग शो सध्या 'AEW' (All Elite Wrestling) चा भाग आहे, परंतु दुखापती आणि अनेक शस्त्रक्रियांच्या त्रासामुळे तो गेल्या काही काळापासून प्रत्यक्ष कुस्तीपासून दूर होता. त्याने कमेंट्री आणि इतर भूमिका पार पाडल्या, पण त्याच्या मनातील 'रेसलर' अजूनही जिवंत आहे.

२०२५ च्या अखेरीस त्याने स्पष्ट केले होते की, त्याला अजून एकदा रिंगमध्ये उतरायचे आहे. विशेष म्हणजे, त्याची ही शेवटची लढत WWE च्या रिंगमध्ये व्हावी, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

५२ किलोची घट आणि फिटनेसचा नवा मंत्र

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बिग शोचा पूर्णपणे बदललेला अवतार दिसत आहे. २३० किलोवरून त्याने आपले वजन १७८ किलोपर्यंत खाली आणले आहे. म्हणजेच त्याने तब्बल ५२ किलो वजन कमी केले आहे.

त्याच्या पोटाची चर्बी पूर्णपणे गायब झाली असून तो आधीपेक्षा जास्त फिच दिसत आहे. "सध्या माझे वजन १७८ किलो आहे आणि माझे पुढचे लक्ष्य १६० किलोपर्यंत पोहोचण्याचे आहे," असे त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

सातत्यपूर्ण मेहनत आणि डाएटचे फळ

हा बदल एका दिवसात झालेला नाही. २०२३ पासून बिग शो आपल्या फिटनेसवर सातत्याने काम करत आहे. जिममधील तासनतास मेहनत, मैदानावर रनिंग आणि कडक डाएट यामुळे त्याला हे यश मिळाले आहे. त्याने आपल्या या प्रवासात प्रशिक्षकांचे आणि चाहत्यांच्या पाठिंब्याचे विशेष आभार मानले आहेत. वयाच्या या टप्प्यावर आणि शारीरिक आव्हाने असतानाही बिग शोने दाखवलेली ही जिद्द नवीन खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT