साऊथॅम्प्टन: भारत (India) विरूध्द न्युझीलंड (New Zealand) यांच्याच सुरु असलेल्या जागतिक कसोटीच्या अंतिम (WTC) सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या सर्वबाद 217 धावांनंतर न्युझीलंडच्या तिसऱ्या दिवस अखेर 2 बाद 101 धावा झाल्या आहेत. परंतु कालचा दिवस आणखीन एका गोष्टीने गाजला ती म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या भांगडा. (bhangra). (WTC Final: Virat Kohli's bhangra won the hearts of the audience)
काल क्षेत्ररक्षण करताना विराट स्लिपमध्ये उभा होता, सामना पहायला आलेले भारतीय फॅन्स भारतीय संघाला ढोल वाजवत भांगडा नृत्य करीत होते. त्यांचा हा जोश पाहून विराटने त्यांच्या तालावर ठेका धरत भांगडा केला. आपल्या संघाच्या कर्णधाराला भांगडा करताना पाहून भारतीय प्रेक्षकांचा जोश आणखीन वाढला. यावेळी विराट देखील त्यांना चिअर करताना दिसला. विराट मैदानावर नृत्य करतानाची ही पहिलीच वेळ नाही, अशाप्रकारे तो अनेकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो.
काल न्युझीलंडच्या काईल जेमिसनने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारताचा डाव 217 धावांवर आटोपला यात जेमिसनने 5 गडी बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.