WTC Final.jpg 
क्रीडा

WTC Final IND Vs NZ : सामन्यात आजही पावसाच्या व्यत्ययाची शक्यता

दैनिक गोमंतक

 साउथॅम्प्टन : भारत (India) विरूध्द न्युझीलंड (New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कालच्या चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. परंतू हवामान विभागाच्या (Weather Forecast) अंदाजानुसार आज पावसाची सकाळी पाऊस नसला तरी संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. किंवा बॅड लाईटमुळे (Bad light) खेळ लवकर थांबवावा लागू शकतो. (WTC Final IND Vs NZ Rain likely to disrupt the match today)

त्यामुळे हा सामना आता ड्रॉ च्या दिशेने जात असला तरी आजच्या पहिल्या सत्रातील खेळ महत्त्वाचा असेल. कारण पहिल्या सत्रात भारताने न्युझीलंडला लवकर बाद केले आणि आजच्या दिवस अखेर भारताने चांगली आघाडी मिळविल्यास भारताला एक संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर न्युझीलंडच्या बाजूने विचार केल्यास कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी चांगली फलंदाजी करुन भारतावर १५० धावांची आघाडी घेतली तर त्यांच्या बाजूने सामना झुकू शकतो. आइसीसीकडून या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला होता, त्यामुळे उद्याचा ६ दिवशी देखील खेळ होऊ शकतो.

मंगळवारी कसे असेल हवामान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी देखील पावसाची शक्यता आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रात पावसाची शक्यता आहे. तसेच आकाशात ढग जमा होऊ शकतात. त्यामुळे बॅड लाईटमुळे खेळ थांबू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT