Brijbhushan Sharan Singh Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: 'ब्रिजभूषण बहाण्याने पोट आणि छातीला...', महिला कुस्तीपटूंचे FIR मध्ये गंभीर आरोप!

Delhi Police Women Wrestlers FIR: दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण विरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत, त्यापैकी एक पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे.

Manish Jadhav

Delhi Police Women Wrestlers FIR: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शने करत आहेत.

यातच, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत, त्यापैकी एक पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे.

या एफआयआरमध्ये महिला कुस्तीपटूंनी WFI अध्यक्षांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये लैंगिक छळ, गैरवर्तन, अयोग्य स्पर्श आणि शारीरिक संपर्क यांचा समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महिला कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, सराव, स्पर्धा आणि WFI कार्यालयात त्यांना लैंगिक छळ सहन करावा लागला. पोलिसांना (Police) दिलेल्या तक्रारीत 7 पैकी 2 महिला कुस्तीपटूंनी अनेकवेळा लैंगिक छळ झाल्याचे सांगितले आहे.

तसेच, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि श्वास चाचणीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या दोन महिला कुस्तीपटूंनी केला आहे.

या महिला कुस्तीपटूंनी पुढे सांगितले की, डब्ल्यूएफआय प्रमुख म्हणून ब्रिजभूषण यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या कारकिर्दीवर होणारा परिणाम यामुळे त्यांनी यापूर्वी याबाबत तोंड उघडले नाही.

असे गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केले

एका महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्यावर 5 वेळा लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आरोपानुसार, 2016 मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये एका टूर्नामेंटदरम्यान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी

एका महिला रेसलरला बोलावून तिच्या पोट आणि छातीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. या घटनेनंतर तिला झोप आली नाही, जेवण जात नव्हते आणि डिप्रेशनची शिकार झाल्याचे महिला कुस्तीपटूने तक्रारीत म्हटले.

तसेच, या महिला कुस्तीपटूने आणखी एका तक्रारीत म्हटले आहे की, 2019 मध्ये पुन्हा एका स्पर्धेदरम्यान बृजभूषण यांनी तिच्या पोटाला आणि छातीला स्पर्श केला होता.

यानंतर त्यांनी अशोक रोडवरील त्यांच्या घरीही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. पहिल्याच दिवशी ब्रिजभूषण यांनी तिच्या खांद्यावर आणि मांड्यांना स्पर्श केल्याचा आरोपही महिलेने (Women) तक्रारीत केला आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोट आणि छातीला स्पर्श केला. यावर त्यांनी श्वास तपासत असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT