Ashleigh Gardner Dainik Gomantak
क्रीडा

WPL Auction 2023: तब्बल 3.20 कोटींची बोली लागलेल्या ऍश्ले गार्डनरची कशी आहे कामगिरी?

वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामासाठीच्या लिलावात ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ऍश्ले गार्डनरसाठी तब्बल 3.20 कोटींची बोली लागली आहे.

Pranali Kodre

WPL Auction 2023: वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत होत आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली आहे. यात भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू ऍश्ले गार्डनरचाही यात समावेश आहे.

ऍश्ले गार्डनर या लिलालात 3 कोटींपेक्षाही अधिकची बोली लागलेली स्मृती मानधनानंतरची दुसरीच खेळाडू ठरली. 25 वर्षीय अष्टपैलू ऍश्ले गार्डनरसाठी गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात चुरस झाली. पण अखेर अहमदाबादच्या फ्रँचायझीने म्हणजेच गुजरात जायंट्सने तिच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले आणि तिला संघात सामील करून घेतले.

गार्डनरने नुकतेच महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 12 धावांत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हे तिचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शनही ठरले.

तिने यापूर्वी दोनवेळा ऑस्ट्रेलियन संघासह टी20 वर्ल्डकपही जिंकली आहे. तिच्याकडे फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीत चांगले योगदान देण्याचीही क्षमता आहे. तिने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून दिला जाणारा सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 2021-22 वर्षातील पुरस्कारही जिंकला होता.

ती सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच तिने महिला बिग बॅश लीगच्या आठव्या हंगामातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला होता.

गार्डनरने आत्तापर्यंत 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1069 धावा केल्या आहेत. तसेच 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 52 वनडे सामने खेळले असून 686 धावा केल्या असून 58 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तिने 3 कसोटी सामने खेळले असून 157 धावा केल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT