Meg Lanning Record Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: 5 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मेग लॅनिंगचा 'भीम पराक्रम'; T20 मध्ये सर्वात जलद 9000 धावांचा गाठला टप्पा

Meg Lanning Record: ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Manish Jadhav

Meg Lanning Record: ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मेग लॅनिंग भारतात खेळल्या जात महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत आहे. मेग लॅनिंगने गुजरात जायंट्सविरुद्ध 39 चेंडूत अर्धशतक झळकावून आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली. लॅनिंग महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने 41 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला तिच्या नेतृत्वाखाली 5 वेळा विश्वविजेते बनवणाऱ्या मेग लॅनिंगने न्यूझीलंडची दिग्गज फलंदाज सोफी डिव्हाईनचा विश्वविक्रम मोडला. डिव्हाईनने टी20 मध्ये 297 डावात 9000 धावा पूर्ण केल्या, तर लॅनिंगने 289 डावात ही कामगिरी केली. लॅनिंग आणि डिव्हाईननंतर गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने 299 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे, तर न्यूझीलंडची माजी कर्णधार सुझी बेट्सने 323 डावांमध्ये नऊ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

मेग लॅनिंगने गेल्या मोसमात ऑरेंज कॅप मिळवली

मेग लॅनिंगचे हे डब्ल्यूआयपीएलमधील चौथे अर्धशतक आहे. या लीगच्या इतिहासात ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. गेल्या वर्षी तिने 9 डावात 345 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. चालू हंगामात लॅनिंगने 4 डावात 147 धावा केल्या आहेत. तिचे पहिले अर्धशतक या मोसमात यूपी वॉरियर्सविरुद्ध आले. चालू मोसमातही ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 25 धावांनी पराभव केला

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 25 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला तर गुजरातचा चार सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या मोबदल्यात 163 धावा केल्यानंतर दिल्लीने गुजरातचा डाव 8 विकेट्सच्या मोबदल्यात 138 धावांवर रोखला. गुजरातकडून ॲश्ले गार्डनरने सर्वाधिक 40 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून जेस जोनासन आणि राधा यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

SCROLL FOR NEXT