RCB Memes
RCB Memes Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: 'नशीबच फुटकं!' RCB च्या सलग चौथ्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore Women vs UP Warriorz: शुक्रवारी (10 मार्च) वूमन्स प्रीमियर लीग 2023 हंगामातील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. या सामन्यात युपीने सहज 10 विकेट्सने विजय मिळवला. मात्र बेंगलोरला या हंगामातील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगलोरला युपीपूर्वी बेंगलोरला दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सने पराभूत केले आहे. त्यामुळे या हंगामात आता केवळ बेंगलोर असा एकमेव संघ ज्यांना अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्याचमुळे सध्या बेंगलोर संघाबाबत अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा संघ 19.3 षटकात 138 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर युपीने एकही विकेट न गमावता आक्रमक खेळ करत 13 षटकातच 139 धावांचे आव्हान पार केले.

बेंगलोरच्या या पराभवानंतर काही युजर्सने मीम्स शेअर करताना नशीबाला दोष दिला आहे, तर काही युजर्सने एक तरी विजय मिळवा, अशा अर्थाचे मीम्स शेअर केले आहेत. काही युजर्सने महिला संघाची बेंगलोरच्या पुरुष संघाशी तुलना केली आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोर संघाकडून एलिस पेरीने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच सोफी डिवाईनने 36 धावांची खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त बेंगलोरकडून केवळ श्रेयंका पाटील आणि एरिन बर्न्स यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यामुळे बेंगलोर संघ 138 धावांवरच सर्वबाद झाला.

युपीकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच दीप्ती शर्माने 3 विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 1 विकेट मिळाली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या युपीकडून एलिसा हेली आणि देविका वैद्य यांनी विकेट न देताच 139 धावांचे आव्हान सहज पार केले. एलिसाने आक्रमक खेळी करताना अर्धशतक केले. तिने 47 चेंडूत नाबाद 96 धावा केल्या. या खेळीत तिने तब्बल 18 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच देविकाने तिची चांगली साथ देताना 31 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावांची नाबाद खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT