Rachael Haynes batting with Alyssa Healy  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मिताली पाठोपाठ अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये दिग्गजांची एन्ट्री! ऑसी दिग्गज मुख्य प्रशिक्षक, तर...

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूला अहमदाबाद फ्रँचायझीने मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.

Pranali Kodre

WPL 2023: यंदा भारतात महिला आयपीएल म्हणजे वूमन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धा खेळवली जाणार असून 5 संघही निश्चित झाले आहेत. या संघांनी पहिल्या हंगामासाठी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, या 5 संघांपैकी अदानी ग्रुपची मालकी असलेली अहमदाबाद फ्रँचायझी आहे. या फ्रँचायझीच्या संघाचे नाव गुजरात जायंट्स असून त्यांनी आता सपोर्ट स्टाफमधील सदस्य नियुक्त करण्याकडे लक्ष दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच या संघाने भारताची महान क्रिकेटपटू मिताली राजला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांनी ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू रचेल हाईन्स हिला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

इतकेच नाही, तर नुकताच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघाची प्रशिक्षक नुशीन अल खादीर यांनाही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय वरिष्ठ भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना फलंदाजी प्रशिक्षक, तर गेवन ट्विविंग क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

हाईन्सने तिच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने 2009 ते 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे. तिने 6 वर्ल्डकपही ऑस्ट्रेलियाकडून जिंकले आहेत. ती गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली होती.

तिने 6 कसोटी सामने खेळले असून 383 धावा केल्या आहेत. तसेच 77 वनडेत 2585 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 84 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 850 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान डब्ल्यूपीएलमधील 5 फ्रँचायझींपैकी अहमदाबाद फ्रँचायझी सर्वात महागडा संघ ठरला होता. या फ्रँचायझीसाठी अदानी यांनी 1289 कोटी रुपये मोजले आहेत. या स्पर्धेत अहमदाबाद फ्रँचायझीव्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि लखनऊ हे संघ निश्चित झाले आहेत.

यातील दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु हे संघ आयपीएल संघांच्या मालकांनीच विकत घेतले आहेत. तर अहमदाबाद फ्रँचायझीची मालकी अदानी ग्रुपकडे असून केप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनऊ फ्रँचायझी विकत घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT