Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 : प्रगती हाच ध्यास : विराट कोहली

भारताचा पुढील सामना येत्या रविवारी लखनौमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

World Cup 2023 : नवी दिल्ली, संतुष्टतेपेक्षा सतत प्रगती करत राहणे, याच ध्येयाचा आपण पाठलाग करत असतो, असे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सध्या भारताचा (चेस मास्टर) आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणारा फलंदाज असा लौकिक मिळवणाऱ्या विराट कोहलीने सांगितले.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाचपैकी पाच सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने आघाडी घेतली आहे आणि धावांचा पाठलाग करण्यात कोहलीची बॅट ‘विराट'' रूप धारण करते, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

केवळ ही विश्वकरंडक स्पर्धाच नव्हे, तर याअगोदरही अनेकदा धावांचा पाठलाग करण्यात क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीच्या पाठीमागे `चेस मास्टर` असे बिरुद आहे.

भारताचा पुढील सामना येत्या रविवारी लखनौमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. या संदर्भात बोलत असताना विराटने आपल्या ध्येयाचा आवर्जून उल्लेख केला.

दिवसागणिक प्रगती अधिकाधिक चांगली कशी होत राहील, यासाठी मी प्रयत्नशील असतो. हा ध्यास सरावाच्या प्रत्येक सत्रात, प्रत्येक वर्षात आणि प्रत्येक मोसमात असतो.

त्यामुळेच मला प्रदीर्घ काळ चांगली कामगिरी करता येत असते, असे विराट म्हणतो. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांत विराट कोहली आत्तापर्यंत ३१ सामने खेळला आहे त्यात त्याने ५५.३६ च्या सरासरीने १,३८४ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT