India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 India Schedule: BCCI चा वर्ल्डकपसाठी प्लॅन रेडी! चेन्नईत पहिली मॅच, तर भारत-पाकिस्तान 'या' दिवशी आमने-सामने

भारतात होणाऱ्या 2023 वनडे वर्ल्डकपचा ड्राफ्ट बीसीसीआयने तयार केला असून आयसीसीकडे पाठवला आहे.

Pranali Kodre

World Cup 2023 India Tentative Schedule: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. हा पुरुषांच्या क्रिकेटमधील 13 वा वनडे वर्ल्डकप आहे.

दरम्यान, बीसीसीआय या वर्ल्डकपचे आयोजक आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. आता या स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयने तयार केले आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्य रिपोर्टनुसार बीसीसीआयने वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसीला पाठवला आहे.

आता हा ड्राफ्ट या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडेही पाठवला जाईल. त्यांच्या फिडबॅकनंतर पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला अंतिम वेळापत्रक घोषित केले जाईल.

कधी सुरू होणार स्पर्धा?

बीसीसीआयने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो. तसेच

भारताचा या वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला खेळवला जाऊ शकतो.

तसेच 2019 वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात पोहचलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघातील सामन्यानेच अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला 2023 वर्ल्डकपला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर तीन दिवसांनी भारतीय संघ पहिला सामना चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

दरम्यान, बीसीसीआयने तयार केलेल्या ड्राफ्टमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ठिकाणांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण उपांत्य सामने 15 आणि 16 नोव्हेंबरदरम्यान खेळवले जाण्याची शक्यता आहे. तसेच अहमदाबादलाच 19 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडेल.

ड्राफ्टनुसार भारतीय संघ साखळी फेरीतील सामने 9 वेगवेगळ्या मैदानांवर खेळेल. तसेच पाकिस्तान संघ साखळी सामने 5 वेगवेगळ्या मैदानांवर खेळणार आहे.

या स्पर्धेतील मोठ्या सामन्यांपैकी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 29 ऑक्टोबरला धरमशालाला होऊ शकतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामना अहमदाबादला 4 नोव्हेंबरला होऊ शकतो, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना पुण्यात 1 नोव्हेंबरला होऊ शकतो.

दरम्यान, वेळापत्रक जाहीर करण्यासाठी इतका उशीर का झाला आहे, याबद्दल अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.

भारतीय संघाचे तात्पुरते 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विुरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 6 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

दहा संघात होणार वर्ल्डकप

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीत सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.

वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.

पात्रता फेरी झिम्बाब्वेमध्ये जून-जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. या पात्रता फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड्स, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि झिम्ब्बावे हे संघ खेळताना दिसणार आहे. त्यांच्यातून दोन संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT