Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना प्रेक्षकांविना होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट

World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 या वर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल.

Manish Jadhav

World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप 2023 या वर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. यातच आता, वर्ल्ड कपपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

29 सप्टेंबर रोजी होणारा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना प्रेक्षकांविना खेळवला जाईल. बीसीसीआयने अचानक ही धक्कादायक अपडेट दिली आहे.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना प्रेक्षकांशिवाय होणार

हैदराबाद पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सराव सामन्यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (HCA) पुरेशी सुरक्षा पुरवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

या सामन्यापूर्वी हैदराबादमध्ये (Hyderabad) गणेश विसर्जन आणि मिलाद-उन-नबी आहे. 29 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आणि मिलन उन नबीमुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

5 ऑक्टोबर 2023 पासून वर्ल्ड कप

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतात आयोजित केला जाईल. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

आतापर्यंत 12 आवृत्त्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. याशिवाय, भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोनदा आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.

2023 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा उद्घाटन सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारताच्या (India) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या हायप्रोफाईल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांच्या वेळा सकाळी 10:30 आणि दुपारी 2.00 या ठेवण्यात आल्या आहेत.

सामन्याचे ठिकाण

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात अहमदाबादमधून होणार आहे. वर्ल्ड कप 2023 चे सामने भारतातील 10 शहरांमधील 10 मैदानांवर खेळवले जातील. या शहरांमध्ये अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, नवी दिल्ली, धरमशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पुणे यांचा समावेश आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचे वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान, 14 ऑक्टोबर, अहमदाबाद

भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धरमशाला

भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनऊ

भारत विरुद्ध श्रीलंका, 2 नोव्हेंबर, मुंबई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT