david warner and glenn maxwell Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, मॅक्सवेलचे विक्रमी शतक; वॉर्नरचेही सलग दुसरे शतक

गोमन्तक डिजिटल टीम

World Cup 2023 : नवी दिल्ली, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची टोलेबाजी आणि त्याअगोदर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेले सलग दुसरे शतक यामुळे

ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सविरुद्ध ८ बाद ३९९ धावांचा डोंगर उभा करुन विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठा ३०९ धावांनी विजय मिळवला.

मॅक्सवेलने ४० चेंडूंत शतक केले. त्याने एकूण ४४ चेंडूंत ९ चौकार आणि ८ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. त्याअगोदर वॉर्नरने ९३ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकारांसह १०४ धावा फटकावल्या.

वॉर्नर, स्मिथ आणि लाबूशेन यांच्या आक्रमक फलंजीमुळे ऑस्ट्रेलिया तीनशेपेक्षा थोड्या अधिक धावा करेल, अशी शक्यता होती; परंतु सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅक्सवेलने तोडफोड फलंदाजी करून सर्व गणित बदलले.

याच मॅक्सवेलने पाकविरुद्ध वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सुरुवातीलाच खराब फटका मारून विकेट बहाल केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला होता. त्यामुळे आज त्याच्या क्रमांकात बदल करण्यात आला. तो त्याच्या फायद्याचा ठरला.

आफ्रिकेला पराभवाचा धक्का देणाऱ्या नेदरलँड््सला हे आव्हान झेपलेच नाही. २१ षटकांत त्यांचा डाव ९० धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने चार विकेट मिळवल्या.

वर्ल्डकपमधील वेगवान शतके

४० चेंडू ः ग्लेन मॅक्सवेल वि. नेदरलँड्स (दिल्ली २०२३)

४९ चेंडू ः एडेन मार्करम वि. श्रीलंका (दिल्ली २०२३)

५० चेंडू ः केविन ओब्रायन वि. इंग्लंड (बंगळूर २०११)

५१ चेंडू ः ग्लेन मॅक्सवेल वि. श्रीलंका (सिडनी २०१५)

५२ चेंडू ः एबी डिव्हिल्यर्स वि. विंडीज (सिडनी २०१५)

वनडेतील मोठे विजय (धावांनुसार)

३१७ ः भारत वि. श्रीलंका (तिरुआनंतपुरम २०२३)

३०९ ः ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड््स (दिल्ली २०२३)

३०४ ः झिम्बाब्वे वि. अमिराती (हरारे २०२३)

२९० ः न्यूझीलंड वि. आयर्लंड (अब्रेदीन २००८)

२७५ ः ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान (पर्थ २०१५)

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके

२ ः मार्क वॉ (१९९६)

२ ः रिकी पाँटिंग (२००३-२००७)

२ ः मॅथ्यू हेडन (२००७)

२ ः डेव्हिड वॉर्नर (२०२३)

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया ः ५० षटकांत ८ बाद ३९९ (डेव्हिड वॉर्नर १०४ - ९३ चेंडू, ११ चौकार, ३ षटकार, स्टीव स्मिथ ७१ - ६८ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, मार्नस लाबूशेन ६२ - ४७ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, ग्लेन मॅक्सवेल १०६ - ४४ चेंडू, ९ चौकार, ८ षटकार, लॉगन वॅन बीक ७४-४) वि. नेदरलँड््स ः २१ षटकांत ९० (मिचेल मार्श १९-२, अॅडम झॅम्पा ८-४)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT