World Chess Championship Ethan Vaz  Dainik Gomantak
क्रीडा

World Chess Championship : गोव्याचा एथन वाझ जागतिक बुद्धिबळात अव्वल

12 वर्षांखालील खुल्या मानांकनात एथन जगात पहिल्या स्थानी

किशोर पेटकर

Goa Chess Player Ethan Vaz : गोव्याचा युवा बुद्धिबळपटू एथन वाझ याला झटपट बुद्धिबळातील ब्लिट्झ प्रकारात जगात अव्वल स्थान मिळाले आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) 12 वर्षांखालील खुल्या मानांकनात एथन जगात पहिल्या स्थानी आहे.

फिडेच्या ताज्या मानांकनानुसार, फिडे मास्टर किताबधारक एथनचे ब्लिट्झ प्रकारातील 12 वर्षांखालील खुल्या गटात सर्वाधिक २३७१ एलो गुण आहेत. १२ वर्षीय एथनचे स्टँडर्ड प्रकारात २३०६ एलो गुण, तर रॅपिड प्रकारात २१४७ एलो गुण आहेत.

१२ वर्षांखालील वयोगटात भारताचाच रोश जैन जगात दुसऱ्या स्थानी आहे. त्याचे ब्लिट्झ प्रकारात २२३३ गुण असून तिसऱ्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या ख्रिस्तियन ग्लोएक्लर याचे २२३२ एलो गुण आहेत.

सबज्युनियर (१५ वर्षांखालील वयोगट) खुल्या गटातील ब्लिट्झ प्रकारातही एथनने भारतीय खेळाडूंना अग्रस्थान मिळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT