England Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: टीम इंडियाला पराभूत करत इंग्लंड सेमीफायनलच्या उबंरठ्यावर, मानधनाचे अर्धशतक व्यर्थ

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये शनिवारी इंग्लंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

India Women vs England Women: महिला टी20 वर्ल्डकपमध्ये शनिवारी (18 फेब्रुवारी) भारतीय महिला संघाला इंग्लंड महिला संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने या सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने जवळपास सेमीफायनलमध्ये प्रवेश पक्का केला आहे.

दरम्यान, इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ग्रुप दोनच्या गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर भारताचा हा या स्पर्धेतील हा पहिला पराभव असून भारताचा संघ ग्रुप दोनच्या गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात इंग्लंडने भारताला 152 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना आणि शफली वर्मा यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. मानधनाने तिसऱ्या षटकात 4 चौकारांसह 16 धावाही काढल्या होत्या.

मात्र, शफलीला लॉरेन बेलने 8 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर जेमिमाह रोड्रिग्जला साथीला घेत मानधनाने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवरप्लेच्या षटकांनंतर भारताची धावगती मंदावली. त्यातच 10 व्या षटकात 16 चेंडूत 13 धावा करून जेमिमाह बाद झाली. पुढच्याच षटकात कर्णधार हरमनप्रीत कौर 4 धावा करून सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.

पण मानधनाला ऋचा घोषने चांगली साथ दिली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. पण त्या दोघीही खेळपट्टीवर स्थिरावल्या असतानाच साराह ग्लेनने मानधनाला 16 व्या षटकात अर्धशतकानंतर लगेचच झेलबाद केले. 50 धावांवर खेळणाऱ्या मानधनाचा झेल नतालिया स्किव्हरने घेतला.

त्यानंतर दीप्ती शर्माही 19 व्या षटकात 7 धावांवर धावबाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. तरी ऋचाने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण तिला अखेरच्या षटकात 31 धावा करता आल्या नाहीत.

भारताला 20 षटकात 5 बाद 140 धावाच करता आल्या. ऋचा 34 चेंडूत 47 धावांवर नाबाद राहिली. तसेच पुजा वस्त्राकर २ धावांवर नाबाद राहिली. इंग्लंडकडून साराह ग्लेनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच सोफी एक्लेस्टोन आणि लॉरेन बेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली होती. भारताकडून रेणूका सिंगने पहिल्या पाच षटकातच डॅनिएल वॅट, सोफिया डन्कली आणि ऍलिस कॅप्सी या पहिल्या तिन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला होता.

पण नंतर इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट आणि नतालिया स्किव्हर यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. पण ११ व्या षटकात शिखा पांडेने नाईटला 28 धावांवर बाद करत त्यांची 51 धावांची भागीदारी तोडली.

पण तरी स्किव्हरने एमी जोन्सला साथीला घेत डाव पुढे नेला. अखेर 17 व्या षटकात नतालिया स्किव्हरला दीप्ती शर्माने 50 धावांवर बाद केले. तिने जोन्सबरोबर 40 धावांची भागीदारी करत इंग्लंडला 120 धावांचा टप्पा पार करून दिला होता. पण जोन्स आणि एक्लेस्टोनने काही आक्रमक फटके मारत इंग्लंड दीडशे धावांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली.

पण रेणूका सिंगने गोलंदाजी केलेल्या अखेरच्या षटकात जोन्स आणि कॅथरिन ब्रंट लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्या. याबरोबरच रेणूकाने या सामन्यातील तिच्या 5 विकेट्सही पूर्ण केले. दरम्यान जोन्सने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली. एक्लेस्टोन 11 धावांवर नाबाद राहिली. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. भारताकडून रेणूका सिंगव्यतिरिक्त शिखा पांडे आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT