Richa Ghosh | Alyssa Healy Dainik Gomantak
क्रीडा

WT20 WC, INDW vs AUSW: ऋचा घोषची चित्त्याची चपळाई! बेल्स उडवत एलिसा हेलीला धाडले माघारी, पाहा Video

महिला टी20 वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये भारताच्या ऋचा घोषने चांगले यष्टीरक्षण करताना एलिसा हेलीला चपळाईने यष्टीचीत केले.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात उपांत्य सामना पार पडला. केपटाऊनला झालेल्या या सामन्यात भारताची यष्टीरक्षक ऋचा घोषने ऑस्ट्रेलियाची अनुभवी क्रिकेटपटू एलिसा हेलीला केलेल्या यष्टीचीतने अनेकांचे लक्ष वेधले.

ऋचा या वर्ल्डकपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसली आहे. तिने शानदार यष्टीरक्षणाबरोबरच फलंदाजीतही भरीव योगदान दिले आहे. दरम्यान, गुरुवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला खेळायला आलेल्या एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी चांगली सुरुवातही दिली.

पहिल्या 7 षटकांमध्ये या दोघींनाही झटपट बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले होते. मात्र, 8 व्या षटकात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने राधा यादवकडे चेंडू सोपवला. तिनेही तिला नाराज न करता तिसऱ्या चेंडूवर हेलीला चकवले. या चेंडूवर हिलीचा शॉट मारण्याच्या प्रयत्न फसला आणि चेंडू ऋचाच्या हातात गेला.

तिनेही चूक न करता हिली क्रिजमध्ये परत येण्यापूर्वीच चपळाईने स्टंप्सवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे हिलीला 26 चेंडूत 25 धावा करून माघारी परतावे लागले. ऋचाने केलेल्या या यष्टीचीतचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला असून युजर्सकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे.

पण, या विकेटनंतरही ऑस्ट्रेलियाने लय कायम ठेवली. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने अर्धशतक पूर्ण केले. तिने 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार मेग लेनिंगने 34 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.

तसेच ऍश्ले गार्डनरनेही शानदार आक्रमक खेळी करताना 18 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 बाद 172 धावा उभारल्या आणि भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून शिखा पांडेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT