WPL X
क्रीडा

WPL 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

WPL 2024 Schedule: वूमन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे. या स्पर्धेच्या तारखा, स्वरुप आणि ठिकाण जाणून घ्या.

Pranali Kodre

Women's Premier League 2024 Schedule:

वूमन प्रीमियर लीग स्पर्धेचा (WPL) दुसरा हंगाम यावर्षी खेळवला जाणार आहे. या हंगामाचे वेळापत्रक समोर आले आहे. डब्ल्यूपीएल 2024 स्पर्धेला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्चला खेळवला जाणार आहे.

पहिल्या हंगामाप्रमाणेच दुसऱ्या हंगामातही 22 सामने खेळवले जाणार आहे. तसेच यंदा दिल्ली आणि बंगळुरू या दोन शहरात डब्ल्यूपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर, तर बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चालू होतील.

तसेच गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी स्पर्धेचे सारखेच स्वरुप असणार आहे. पाच संघांमधील पहिले तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. तसेच गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेला संघ थेट अंतिम सामना खेळले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटर सामना होईल. एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम सामना खेळेल.

डब्लुपीएल 2024 मधील पहिला सामना 23 फेब्रुवारीला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात बंगळुरूला खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर 15 मार्च रोजी होईल, तर अंतिम सामना 17 मार्चला होईल. एलिमिनेटर आणि अंतिम सामना दिल्लीमध्ये होणार आहे.

असे आहेत डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेचे वेळापत्रक

  • 23 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू

  • 24 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स, बंगळुरू

  • 25 फेब्रुवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू

  • 26 फेब्रुवारी - युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू

  • 27 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स, बंगळुरू

  • 28 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स, बंगळुरू

  • 29 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू

  • 1 मार्च - युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, बंगळुरू

  • 2 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू

  • 3 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू

  • 4 मार्च - युपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, बंगळुरू

  • 5 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली

  • 6 मार्च - गुजरात दायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली

  • 7 मार्च - युपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली

  • 8 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स, दिल्ली

  • 9 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली

  • 10 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली

  • 11 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स, दिल्ली

  • 12 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली

  • 13 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली

  • 15 मार्च - एलिमिनेटर, दिल्ली

  • 17 मार्च - अंतिम सामना, दिल्ली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT