Pranali Kodre
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा (WPL) दुसरा हंगाम पुढीलवर्षी म्हणजेच 2024 मध्ये खेळवला जाणार आहे.
या हंगामासाठी 9 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत लिलाव पार पडला.
या लिलावात बोली लागलेल्या 30 खेळाडूंपैकी 5 खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. या पाच खेळाडूंवर एक नजर टाकू.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी ऍनाबेल सदरलँड्स हिला या लिलावात तब्बल 2 कोटींची बोली लागली. तिला दिल्ली कॅपिटल्स संघाने खरेदी केले.
भारताच्या काशवी गौतमलाही विक्रमी 2 कोटींची बोली लागली. तिला गुजरात जायंट्सने खरेदी केले.
भारताची वृंदा दिनेश हिला 1 कोटी 30 लाखांची बोली लागली. तिला युपी वॉरियर्सने संघात सामील करून घेतले.
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेची अनुभवी गोलंदा शबनीब इस्माईल हिच्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये मोजले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफिल्ड हिला गुजरात जायंट्सने 1 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.