Charlotte Edwards | Jhulan Goswami Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई इंडियन्स संघात झुलनसह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकटरची एन्ट्री, सांभाळणार 'ही' जबाबदारी

मुंबई इंडियन्सने झुलन गोस्वामीसह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूला मोठी जबाबदारी दिली आहे.

Pranali Kodre

Women's Premier League: भारतात यंदा पहिल्यांचा महिला आयपीएल म्हणजे वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगाम खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 5 संघात पार पडणार आहे. यातील मुंबई इंडियन्सचाही एक महिला संघ असणार आहे. दरम्यान, मुंबई संघाने त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नियुक्ती केली आहे.

भारताची महान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्याकडे मुंबईच्या महिला संघाची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशक्षक अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

तसेच इंग्लंडची माजी कर्णधार आणि वनडे व कसोटीत सर्वाधिक धावा करणारी दुसऱ्या क्रमांकाची क्रिकेटपटू शारलोट एडवर्ड हिच्याकडे या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.

40 वर्षीय झुलन गोस्वामी गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली असून तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 355 विकेट्स घेतल्या आहेत. ती सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला क्रिकेटपटूही आहे.

तसेच एडवर्डबद्दल सांगायचे झाले तर तिने वनडेमध्ये 9 शतके आणि 46 अर्धशतकांसह 5992 धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत 4 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1676 धावा केल्या आहेत. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटही खेळले असून 95 सामन्यांत 2605 धावा केल्या आहेत. इतकेच नाही, तर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 विकेट्सही घेतल्या आहेत.

याशिवाय मुंबई इंडियन्यच्या महिला संघात भारताची अष्टपैलू देविका पळशिकर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून, तर तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघाची मॅनजर म्हणून जबाबदारी सांभाळेल.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स ग्रुपने डब्ल्यूपीएलसाठी महिला संघाची फ्रँचायझी घेण्यासाठी 912.99 कोटी रुपये खर्च केला आहे.

डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई व्यतिरिक्त दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद आणि लखनऊ या फ्रँचायझींचे संघही असणार आहेत. यातील दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु हे संघ आयपीएल संघांच्या मालकांनीच विकत घेतले आहेत. तर अहमदाबाद फ्रँचायझी अदानी ग्रुपने आणि केप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनऊ फ्रँचायझी विकत घेतली आहे.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामाचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी पार पडणार असल्याचे समजत आहे. तसेच हा हंगाम मार्चमध्ये खेळवला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT