Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई-दिल्लीला कोटींचे बक्षीस, तर पुरस्कार विजेतेही लखपती; संपूर्ण लिस्ट पाहा एका क्लिकवर

MI vs DC: वूमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला आणि उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला कोट्यवधींचे बक्षीस देण्यात आले.

Pranali Kodre

WPL 2023 Awards: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने रविवारी (26 मार्च) पहिल्या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. मुंबई इंडियन्सने ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या डब्ल्युपीएलच्या अंतिम सामन्यात मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने विजय मिळवला.

यासह मुंबई इंडियन्सने पहिल्या डब्ल्युपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा इतिहासही रचला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 132 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात 3 विकेट्स गमावत 134 धावा करत पूर्ण केला. मुंबई इंडियन्सकडून नतालिया स्किव्हरने 55 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी केली. तिच या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरली.

दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर हंगामात दमदार कामगिरी करत लक्ष वेधलेल्या खेळाडूंचा गौरवही करण्यात आला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या खेळाडूंना त्यांची बक्षीस रक्कमही देण्यात आली.

विजेत्या संघ मुंबई इंडियन्सला विजेतेपदाच्या ट्रॉफीसह 6 कोटींचे बक्षीस देण्यात आले. तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटींचे विजेतेपद देण्यात आले. याशिवाय देखील विविध खेळाडूंनाही वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या हंगामातील सर्वोत्तम खेळाडू मुंबई इंडियन्सची हेली मॅथ्युज ठरली. तिने संपूर्ण हंगामात 10 सामने खेळताना 271 धावा करताना 16 विकेट्सही घेतल्या. तसेच या हंगामात मॅथ्युजने सर्वाधिक विकेट्स घेण्याबद्दल पर्पल कॅपही जिंकली.

डब्ल्युपीएलमधील सर्व पुरस्कार विजेते आणि त्यांना मिळालेली बक्षीस रक्कम -

विजयी संघ - मुंबई इंडियन्स - 6 कोटी

उपविजयी संघ - दिल्ली कॅपिटल्स - 3 कोटी

सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) - मेग लेनिंग (345 धावा) - 5 लाख

सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप) - हेली मॅथ्युज (16 विकेट्स) - 5 लाख

हंगामातील सर्वात्तम पॉवर स्ट्रायकर - सोफी डिवाईन (13 षटकार) - 5 लाख

हंगामातील सर्वोत्तम झेल - हरमनप्रीत कौर (विरुद्ध युपी वॉरियर्स) - 5 लाख

हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू - हेली मॅथ्युज (271 धावा आणि 16 विकेट्स) - 5 लाख

हंगामातील उदयोन्मुख खेळाडू - यास्तिका भाटीया (214 धावा आणि यष्टीमागे 13 विकेट्स) - 5 लाख

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू - नतालिया स्किव्हर (नाबाद 60 धावा) - 2.50 लाख

सामन्यातील सर्वोत्तम पॉवर स्ट्रायकर - राधा यादव (2 षटकार) - 1 लाख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT