Women's Premier League 2024: Shafali Verma & Meg Lanning Shines in Delhi Capitals vs UP Warriorz Match.  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: शफाली-लॅनिंगचा जलवा; दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय; यूपी वॉरियर्सचा सलग दुसरा पराभव

WPL 2024, Delhi Capitals vs UP Warriorz: या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला.

Manish Jadhav

Delhi Capitals Won Against UP Warriorz:

वुमन्स प्रिमियर लीग 2024 चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि UP वॉरियर्स यांच्यात बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. तर ॲलिसा हिली कर्णधार असलेल्या यूपी वॉरियर्सचाही रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 2 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते.

मात्र, आज झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा नऊ गडी राखून पराभव केला. दिल्लीची स्टार सलामीवीर शफाली वर्माने शानदार फलंदाजी केली. शफाली आणि मॅग लॅनिंग या जोडीच्या शानदार खेळीच्या जोरावर दिल्लीने सामना जिंकला.

पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने धडा घेत हंगामातील आपला विजय यूपी वॉरियर्सविरुद्ध नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 119 धावा केल्या होत्या. यूपीने दिल्ली कॅपिटल्सला 120 धावांचे लक्ष्य दिले होते. यूपीकडून श्वेता सेहरावतने (42 चेंडूत 45, पाच चौकार, एक षटकार) सर्वाधिक धावा केल्या. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला 20 धांवाचाही टप्पा ओलांडता आला नाही.

ग्रेस हॅरिसने 17, कर्णधार ॲलिसा हिलीने 13 तर किरण नवगिरे आणि पूनम खेमनारने प्रत्येकी 10 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे, दिल्लीसाठी राधा यादवने चार आणि मारिजन कॅपने तीन बळी घेतले. त्याचबरोबर, ॲनाबेल सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दुसरीकडे, प्रत्युत्तरात दिल्लीने 14.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 123 धावा करुन सामना जिंकला. संघाने 33 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. दिल्लीकडून शफाली वर्माने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. तिने 43 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार मॅग लॅनिंगने 43 चेंडूत 51 धावा केल्या, यामध्ये तिने सहा चौकार मारले.

शफाली आणि लॅनिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. संघाला एका धावेची गरज असताना कर्णधार लॅनिंग बाद झाली. सोफी एक्लेस्टोनने तिला वृंदा दिनेशकरवी झेलबाद केले. मात्र, तिच्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जने विजयी चौकार ठोकत सामना संपवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT