Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. रविवारी (5 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने 60 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात बेंगलोरकडून फारशी चांगली गोलंदाजी झाली नाही, त्यामुळे सध्या मीम्स व्हायरल होत आहेत.
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंग आणि शफली वर्मा यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना बेंगलोरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या दोघींनीही अर्धशतके करताना तब्बल 162 धावांची भागीदारी केली.
लेनिगने 43 चेंडूत 14 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तसेच शफालीने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. या दोघींनाही 15 व्या षटकात हिदर नाईटने बाद केले.
पण त्यांनतरही मॅरिझन कापने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तसेच जेमिमाह रोड्रिग्जने 15 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावांची नाबाद खेळी केली. या दोघींनीही नाबाद 60 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीने 20 षटकात 2 बाद 223 धावा केल्या.
बेंगलोरकडून हिदर नाईट व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही नाईटनेही 2 विकेट्स घेताना 3 षटकातच तब्बल 40 धावा दिल्या. बेंगलोरकडून एकूण 7 जणींनी गोलंदाजी केली. विशेष म्हणजे सातही जणींचा इकोनॉमी रेट 8 च्या वर राहिला. त्यामुळे सध्या मीम्स व्हायरल होत आहेत.
खरंतर आयपीएलमध्ये पुरुषांचा बेंगलोर संघासाठीही अनेकदा त्यांची गोलंदाजी चिंतेचे कारण राहिली आहे. त्यांना खराब गोलंदाजीमुळे काही सामनेही गमवावे लागले आहे. विशेष गोष्ट अशी की आयपीएलच्या पहिल्या हंगामात पुरुषांच्या बेंगलोर संघानेही कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना 200 पेक्षा अधिक धावा दिल्या होत्या.
त्यावेळी बेंगलोरविरुद्ध कोलकाताने 3 बाद 222 धावा केल्या होत्या. आणि आता महिलांच्या बेंगलोर संघानेही पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामात पहिला सामना खेळताना 200 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. याच गोष्टीचीही चाहत्यांकडून मीम्स शेअर करताना तुलना केली जात आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरला 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 163 धावाच करता आल्या. बेंगलोरकडून कर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक 35 धावा केल्या. तसेच एलिस पेरीने 31, हिदर नाईटने 34 आणि मेगन शटने नाबाद 30 धावांची खेळी केली. मात्र कोणालाही मोठी खेळी करत सामना जिंकवून देता आला नाही. दिल्लीकडून तारा नॉरिसने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.