Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

महिला IPL साठी BCCI ने बनवली खास योजना, देशांतर्गत क्रिकेटचे बदलले कॅलेंडर

Women's IPL: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मार्च 2023 मध्ये पहिल्या महिला आयपीएलचे आयोजन करण्याची योजना आखली आहे.

दैनिक गोमन्तक

Women's IPL: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मार्च 2023 मध्ये पहिल्या महिला आयपीएलचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली महिलांच्या आयपीएलसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएलसाठी महिला डोमॅस्टिक क्रिकेट कॅलेंडरमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत चालणाऱ्या महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम एका महिन्याने वाढवण्यात आला आहे.

महिला आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेट हंगाम कॅलेंडरमध्ये बदल

महिलांच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात 11 ऑक्टोबर रोजी T20 स्पर्धेने होईल, तर फेब्रुवारी 2023 मध्ये एकदिवसीय स्पर्धेने समाप्त होईल. 2018 पासून बीसीसीआय (BCCI) महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन करत आहे. मात्र, पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये शो मॅच झाली. या स्पर्धेत अनेक परदेशी खेळाडूही सहभागी झाले होते. खरे तर पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिला आयपीएलही (IPL) व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे.

मिताली राजही होणार महिला आयपीएलचा भाग!

माजी भारतीय कर्णधार मिताली राज व्यतिरिक्त स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांसारख्या दिग्गज महिला खेळाडूंच्या मते, पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे महिला आयपीएलही व्हायला हवी. त्याचवेळी भारताची माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) निवृत्तीतून बाहेर पडून या स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वास्तविक, तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, 'मी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु मी हा पर्याय खुला ठेवला आहे. महिला आयपीएलला जास्त वेळ उरलेला नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT