Royal Challengers Bangalore Team  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: स्मृती-ॲलिस पेरीची शानदार खेळी; आरसीबीने यूपी वॉरियर्सचा केला 23 धावांनी पराभव

Women Premier League 2024 Royal Challengers Bangalore vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग 2024 चा 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

Women Premier League 2024 Royal Challengers Bangalore vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग 2024 चा 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात जबरदस्त सामना झाला. या सामन्यात ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि ॲलिस पेरीच्या शानदार खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 198 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सला 20 षटकात केवळ 175 धावा करता आल्या आणि सामना 23 धावांनी गमवावा लागला. यूपी वॉरियर्सचा या मोसमातील हा तिसरा पराभव आहे तर बंगळुरुचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे.

दरम्यान, स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आपले पहिले दोन सामने गमावल्यानंतर मैदानात उतरला होता. तर ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील यूपी वॉरियर्सने गेल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला होता. WPL 2024 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिथे सर्व संघ टॉप 2 मध्ये जाण्यासाठी मेहनत घेत आहेत. बंगळुरु आणि यूपी वॉरियर्ससाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारत यूपी वॉरियर्सचा पराभव केला.

ॲलिसा हिलीची शानदार खेळी व्यर्थ

दुसरीकडे, 199 धावांचा पाठलाग करताना कर्णधार ॲलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी दमदार सुरुवात केली दिली. या दोघाींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 4.2 षटकांत 47 धावा केल्या, परंतु सोफी डिव्हाईनच्या एका उत्कृष्ट चेंडूवर किरण नवगिरे 11 चेंडूत 18 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली.

चमारी अटापट्टू पुन्हा एकदा काही विशेष काही करु शकली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या 34 वर्षीय अटापट्टू अवघ्या आठ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला वेयरहमने एलबीडब्ल्यू आऊट केले.

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली ग्रेस हॅरिस पाच धावा करुन बाद झाली. सोफी डिव्हाईनने तिला आपली शिकार बनवली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली श्वेता सेहरावत एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला आशा शोभनाने आऊट केले. यूपीची कर्णधार ॲलिसा हेली 55 धावा करुन आऊट झाली.

त्यानंतर दीप्ती शर्मा 33 धावा करुन बाद झाली. 18व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यूपी वॉरियर्सची सहावी विकेट पडली. तिला आशा शोभनाने आऊट केले.

यूपीची सातवी विकेट सोफी एक्लेस्टोनच्या रुपाने पडली. तिला वेयरहमने बोल्ड केले. सोफीला तीन चेंडूत चार धावा करता आल्या. आरसीबीचा गोलंदाज मोलिनक्सने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूजा खेमनारला बाद केले.

आरसीबीचा डाव

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या आरसीबीने यूपीविरुद्ध 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या होत्या. या सामन्यात सलामीला आलेल्या एस मेघना आणि स्मृती मानधना यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली होती. मेघनाने 21 चेंडूत 28 धावा केल्या. मात्र, अंजली सरवानीने तिला चमारी अटापट्टूकरवी झेलबाद केले.

त्याचवेळी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली ॲलिस पेरीही मागे राहिली नाही. ऑरेंज कॅपधारी मानधनासोबत तिने दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची मोठी भागीदारी केली. तिने 37 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.

मात्र, शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. मानधाना 50 चेंडूत 80 धावा करुन बाद झाली. मात्र, या मोसमात ती दुसऱ्यांदा शतक झळकावण्यास मुकली. याआधी तिने दिल्लीविरुद्ध 74 धावांची इनिंग खेळली होती. ऋचा घोष 10 चेंडूत 21 धावा करुन नाबाद राहिली तर सोफी डिव्हाईन 2 चेंडूत 2 धावा करुन नाबाद राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maje Driver App: खासगी दुचाकींवर भाडे वाहतूक केल्यास थेट जप्ती! 50 वर्षांवरील मोटारसायकल पायलटांना 'DSSY'चा लाभ; CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

PM मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याकडून गौरव

Kannada Medium Schools: कानडी शाळांचा प्रश्न कर्नाटक दरबारी; मंत्री जारकीहोळी करणार मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासोबत चर्चा

Pedne Toll Booth Case: टोल बूथ तोडफोड प्रकरण! नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर

Viral Video: अचानक कोसळलं सुपरमार्केटचं छत! क्षणात उडाला गोंधळ, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT