WNCL Final Match Dainik Gomantak
क्रीडा

WNCL Final Video: बाबो! शेवटच्या ओव्हरमध्ये पडल्या 5 विकेट्स, तेही फायनल मॅचला; पाहा अंतिम क्षणांचा थरार

क्रिकेटमध्ये अनेकदा रोमांचक सामने पाहायला मिळतात, असाच एक WNCL स्पर्धेतील अंतिम सामना नाट्यमयरित्या संपला.

Pranali Kodre

WNCL Final Video: क्रिकेटमध्ये अनेकदा रोमांचक सामने होतात. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत थरार सुरू असतो. असाच एक अटीतटीचा सामना ऑस्ट्रेलियामध्ये झाला. खरंतर सध्या ऑस्ट्रेलियाचा पुरुष राष्ट्रीय संघ भारत दौऱ्यावर आणि महिला संघ टी20 वर्ल्डकमध्ये खेळत असला, तरी ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत क्रिकेट सुरू आहे.

नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये वूमन्स नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना नाट्यमयरित्या संपला. शनिवारी झालेल्या या अंतिम सामन्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा अंतिम सामना तास्मानिया विरुद्ध साऊथ ऑस्ट्रेलियन स्कॉर्पियन महिला संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात तास्मानियाने एक धावेनेच विजय मिळवला.

झाले असे की हा अंतिम सामना सुरु असताना पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर सामन्याती षटकेही कमी करण्यात आली. दरम्यान, तास्मानियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 264 धावा केल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे साऊथ ऑस्ट्रेलिया समोर 47 षटकात 243 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

तास्मानियाकडून कर्णधार एलिस विलानीने सर्वाधिक 110 धावांची खेळी केली. तसेच नावोमी स्टॅलेनबर्गने 75 धावांची खेळी केली. तसेच साऊथ ऑस्ट्रेलियाकडून अनेसू मुशांगवे आणि अमंडा-जेड वेलिंग्टन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 243 धावांचा पाठलाग करताना साऊथ ऑस्ट्रेलियाने 46 व्या षटकापर्यंत कर्टनी वेब आणि एम्मा डी ब्रो यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 5 बाद 239 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना विजयासाठी केवळ 4 धावांची गरज होती.

पण अखेरच्या 47 व्या षटकात साऊथ ऑस्ट्रेलियाने एक-दोन नाही, तर तब्बल 5 विकेट्स गमावल्या. तसेच त्यांना या षटकात दोनच धावा घेता आल्या. या षटकात सारा कोयटेने गोलंदाजी केली होती.

तिने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऍनी ओ'नीलला त्रिफळाचीत केले. त्यानंतर एक धाव निघाली. पण तिसऱ्या चेंडूवर कर्णधार जेम्मा बार्सबी यष्टीचीत झाली. चौथ्या चेंडूवर अमंडा-जेड वेलिंग्टन धावबाद झाली, तर पाचव्या चेंडूवर कोयटेने इला विलसनला पायचीत पकडले.

सहव्या चेंडूवर एनेसू मुशगेन्वे दुहेरी धावा घेताना धावबाद झाली. त्यामुळे हा सामना तास्मानियाने नाट्यमयरित्या एका धावेने जिंकला. अखेरच्या षटकात पाचपैकी तीन विकेट्स घेणारी कोयटे सामनावीर देखील ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT