Aamir Khan Dainik Gomantak
क्रीडा

अमिर खान IPL खेळणार? रवी शास्त्रींचे धक्कादायक उत्तर

बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 68 सामने खेळण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स ह्या तीन टीम प्लेऑफसाठीच्या लिस्ट मध्ये वर सरकल्या आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा (Aamir Khan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. या व्हिडिओमध्ये तो आयपीएलमधील एका संघाकडून खेळण्याची संधी मागताना दिसून येत आहे. (Will Aamir Khan play in IPL Ravi Shastri shocking answer)

स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत. व्हिडिओमध्ये अँकरने रवी शास्त्री यांना विचारले की, आगामी आयपीएलमध्ये आमिरला संधी मिळेल का? त्याला उत्तर देताना माजी भारतीय प्रशिक्षक म्हणतात की, "तो नेटमध्ये चांगला दिसत आहे. त्याला त्याच्या फूटवर्कवर थोडा वेळ घालवायला हवा आणि मग त्याला कोणत्याही संघात संधी मिळून जाईल."

रवी शास्त्रींच्या उत्तरावर आमिर खानची आली प्रतिक्रिया

रवी शास्त्रीच्या (Ravi Shastri) उत्तरावरवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला की- "रवी जी, तुला माझे फूटवर्क आवडले नाही याबद्दल मी थोडा निराश आहे. मला असे वाटते की तू लगान पाहिला नाहीस... आता पुन्हा माझ्याकडे बघा... मला वाटते की मी ज्या संघात असेन तो प्रत्येक संघ भाग्यवान असेल... माझी शिफारस करा, मजा येईल."

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकने चर्चेमध्ये आले आहेत. शास्त्रींनी अतरंगी ड्रेसमधील एकामागून एक तीन फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये शास्त्रींची चाहत्यांना नवी स्टाईल पाहायला मिळत आहे. ट्विट केलेला पहिला फोटो, त्यामध्ये शास्रींनी काळा चष्मा, जॅकेट घातले आहे आणि त्यांनी गळ्यात चेन घातली आहे. शास्त्रींनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गुड मॉर्निंग' हे सर्व पर्यायी आहे, तुम्ही अजिबात झोपत नाही.

त्याच्या थोड्या वेळानतच, माजी मुख्य प्रशिक्षकाने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'माझे कुटुंब मुंबईत राहते आणि मी जवळच राहतो.' भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री इथेच थांबले नाहीत आणि काही वेळातच त्यांनी तिसरा फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा कोट परिधान केला आहे. तर फोटोत त्यांच्यासोबत एक वृद्ध महिलाही दिसून येत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शास्त्रींनी लिहिले की, 'मी त्यांच्या डीएममध्ये आहेत. तर च्या माझ्या व्हीआयपी गेस्टलिस्टमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT