David Warner Dainik Gomantak
क्रीडा

David Warner: 100 व्या कसोटी द्विशतक करताच वॉर्नर का गेला मैदानाबाहेर? पाहा Video

वॉर्नर 100 व्या कसोटीत द्विशतकी खेळी केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला.

Pranali Kodre

David Warner: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सध्या मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू आहे. कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हा 100 वा कसोटी सामना आहे. वॉर्नरने या सामन्यात द्विशतक करत या सामन्याला आणखी खास बनवले आहे. मात्र, असे असले तरी तो रिटायर्ड हर्ट होत मैदानातून बाहेर गेला.

वॉर्नरने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात 254 चेंडूत 200 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. पण द्विशतकाचे सेलिब्रेशन करत असताना त्याची दुखापत वाढली आणि त्याला मैदानातून बाहेर जावे लागले.

वॉर्नरला द्विशतकाला गवसणी घालण्यापूर्वीच ही खेळी करताना पायाला क्रॅम्प्स आले होते. त्यावर त्याने उपचारही घेतले होते. पण, त्यानंतर त्याने ज्याप्रकारे त्याचे सेलिब्रेशन केले, त्यामुळे त्याची क्रॅम्प्स आणखी वाढल्याची शक्यता आहे. कारण नंतर तो वेदनेने कळवताना दिसला. त्यामुळे त्याच्यावर लगेचच मेडिकल स्टाफकडून उपचार करण्यात आले.

मात्र, तो पुढे फलंदाजी कायम करू शकला नाही आणि त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून परतावे लागले. दरम्यान, आता दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असल्याने वॉर्नर उपचार घेऊन तिसऱ्या दिवशी फलंदाजीला येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाला देखील आशा असेल की वॉर्नर लवकर तंदुरुस्त व्हावा.

दरम्यान, वॉर्नर हा कारकिर्दीतील १०० व्या कसोटीत द्विशतक करणारा जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. असा कारनामा यापूर्वी जो रूटने केला होता. तसेच वॉर्नरने ८००० कसोटी धावांचा टप्पाही पार केला आहे.

ऑस्ट्रेलियाचे सामन्यावर वर्चस्व

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 91 षटकांत 3 बाद 386 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 85 धावांची खेळी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावांवरच संपुष्टात आल्याने ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

SCROLL FOR NEXT