Uncle Percy X
क्रीडा

Uncle Percy Died: संगकारापासून रोहितपर्यंत क्रिकेटर्सला आपलेसे करणारे कोण होते 'पर्सी अंकल'?

Who is Uncle Percy?: कोण होते क्रिकेटचे सुपरफॅन पर्सी अंकल, ज्यांच्या निधनाबद्दल BCCI नेही व्यक्त केला शोक

Pranali Kodre

Who is Uncle Percy?

भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असतानाच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. क्रिकेटचे सुपरफॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेले पर्सी अबेसेकरा यांचे श्रीलंकेत वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण क्रिकेटविश्वातून शोक व्यक्त होत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आणि श्रीलंकन क्रिकेट, बीसीसीआय यांच्यासह क्रिकेट बोर्डांनीही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पर्सी हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी श्रीलंका क्रिकेटने मदतही देऊ केली होती. मात्र, अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना श्रीलंका क्रिकेटने म्हटले की 'त्यांच्या क्रिकेट मैदानावरील उर्जेची कमी नेहमीच भासत राहिल.'

तसेच बीसीसीआयनेही शोक व्यक्त करताना लिहिले की 'पर्सी अबेसेकरा हे उर्जेचा स्त्रोत होते. ते त्यांच्या पाठिंब्याने क्रिकेट मैदानावरील प्रत्येक क्षण भारावून टाकायचे. त्यांचे भारतीय क्रिकेटपटूंशीही खूप चांगले नाते होते.'

'त्यांनी ज्याज्या वेळी भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला, त्या त्या वेळी खेळाडूंशी चांगले संबंध तयार केले. त्यांच्या उपस्थितीची कमी नेहमीच जाणवेल. त्यांच्या कुटुंबाच्या आणि जवळच्या लोकांच्या दु:खात सामील आहोत.'

कोण होते पर्सी अबेसेकरा?

पर्सी अबेसेकरा हे क्रिकेट विश्वास पर्सी अंकल म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीलंका क्रिकेटचे मोठे चाहते होते. ज्यावेळी सुपर फॅन ही व्याख्याही अनेकांना माहिती नव्हती, तेव्हापासून पर्सी अंकल श्रीलंका संघाला पाठिंबा देत होते. ते स्टेडियममध्ये श्रीलंकेचा झेंडा फडकावताना दिसायचे. पर्सी अनेकदा खेळाडूंवर छोट्या छोट्या कविताही करायचे.

ते श्रीलंका संघाला 1979 वर्ल्डकपपासून पाठिंबा देत आहेत. पण ते प्रकाशझोतात 1996 वर्ल्डकपदरम्यान आले. त्या वर्ल्डकपमध्ये ते लाहोरला श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये श्रीलंकेचा झेंडा फडकावताना दिसले होते.

त्यांचे श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंबरोबरच इतर देशातील क्रिकेटपटूंशीही फार चांगले संबंध होते. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर गेल्यानंतरही अनेक क्रिकेटपटू त्यांची भेट घ्यायचे.

नुकत्याच ऑगस्ट-सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यानही भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी ते आजारी होते. एकदा न्यूझीलंडचे क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी त्यांना मिळालेला सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी पर्सी अंकलला दिली होती.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यासाठीही ते उपस्थित होते.

त्याचमुळे सर्वांचे लाडके असलेल्या पर्सी अंकल यांना क्रिकेट विश्वातून सध्या श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT