Mukesh Kumar Dainik Gomantak
क्रीडा

Mukesh Kumar: मेहनतीला सलाम! घरची परिस्थिती हलाखीची; पाचशे रुपयांसाठी स्थानिक संघात खेळणारा मुकेश कुमार टीम इंडियात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकांसाठी मुकेश कुमारला टीम इंडियात संधी मिळाली आहे.

Pranali Kodre

Mukesh Kumar International Cricket Debut for Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून आता कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (20 जुलै) सुरु झाला. या सामन्यातून भारताकडून मुकेश कुमारचे पदार्पण झाले आहे.

बंगालचा वेगवान गोलंदाज असलेला मुकेश भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 395 वा खेळाडू ठरला आहे. तसेच कसोटी पदार्पण करणारा 308 वा खेळाडू ठरला आहे.

बिहारमधील गोपाळगंजमध्ये जन्मलेल्या 29 वर्षीय मुकेशसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भारतातील अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे तो देखील छोट्या गावातून मोठ्या शहरात आला आणि क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवू लागला.

साल 2012 मध्ये तो कोलकाताला आला ते त्याच्या वडिलांना त्यांच्या टॅक्सी व्यावसायात मदत करण्यासाठी. तिथे तो 400-500 रुपयांसाठी स्थानिक सामने खेळू लागला.

त्याने त्याच्या प्रवासाबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले होते, 'माझ्यासारखे अनेक खेळाडू आहे जे छोट्या गावातून, त्यांचे घर सोडून स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोठ्या शहरात येतात. मला बंगालच्या रणजी संघात येईपर्यंत स्विंग किंवा सीमबदद्ल काहीही माहित नव्हते. मला फक्त टप्प्यावर गोलंदाजी करायची इतकेच माहित होते, जे मला गोपाळगंजमधील माझ्या प्रशिक्षकांनी शिकवले होते.'

'माझ्या वडिलांनी मला एक वर्ष दिले होते, जर काहीही झाले नसते, तर मला त्यांच्याबरोबर काम करावे लागले असते. पण त्यांना हे देखील माहित होते की मला क्रिकेट खेळायचे आहे आणि जेव्हा माझी इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली, तेव्हा त्यांचाच सल्ला होता की मी कोलकाताला यावे आणि क्रिकेट खेळावे व त्यांना मदत करावी.'

त्यानंतर हळुहळू मुकेश प्रगती करत गेला. तो मोठे स्पेल टाकू शकतो, ही त्याचे जमेची बाजू ठरली. २०१४ साली त्याने दिलेल्या एका ट्रायलने त्याचे आयुष्य बदलले. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका ट्रायलमध्ये त्याने बंगालचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक राणादेव बोस यांचे लक्ष वेधले. तसेच हे ट्रायल व्हीव्हीएस लक्ष्मण, वकार युनूस आणि मुथय्या मुरलीधरन यांनी घेतले होते.

त्याला नंतर बंगालच्या वरिष्ठ संघातही संधी मिळाली. त्याने 2015 मध्ये प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेट प्रकारात पदार्पण केले. तसेच 2016 मध्ये त्याने टी20 क्रिकेटमध्येही बंगालकडून पदार्पण केले. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय अ संघात स्थान मिळवले.

त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पहिल्यांदा भारतीय संघात स्थानही मिळाले. दरम्यान, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पण त्याला नुकत्याच झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यासाठी भारताचा नेट गोलंदाज म्हणूनही संधी मिळाली. त्यानंतर आता त्याने भारताच्या राष्ट्रीय संघात संधीही मिळवली आहे.

दिल्लीकडून खेळला आयपीएल

आयपीएल 2023 लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटी रुपयात खरेदी केले. त्याने 10 सामन्यांमध्ये खेळताना 7 विकेट्स घेतल्या. तो त्याआधी दिल्लीसाठी नेट गोलंदाज म्हणून खेळत होता. त्यावेळी त्याने दिल्लीच्या संघव्यवस्थापनाला प्रभावित केले होते.

मुकेशने गेल्या काही देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2022-23 रणजी हंगामातही प्रभावित केले होते. त्याने या हंगामात 5 सामन्यातच 22 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याला त्याच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

मुकेशची कारकिर्द

मुकेशने आत्तापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2.70 च्या इकोनॉमी रेटने 149 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 24 ए श्रेणी सामने खेळताना 26 विकेट्स घेतल्या आहेत, तर 33 टी20 सामने खेळताना 32 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT