Smriti Manadhana

 

Dainik Gomantak 

क्रीडा

भारतात महिला आयपीएलचे आयोजन कधी होणार, BCCI सचिव जय शाहांचा खुलासा

भारतातील महिला क्रिकेट (Women's cricket) दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. विदेशी लीगमध्येही भारतीय महिला संघ आपली छाप पाडत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील महिला क्रिकेट दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. विदेशी लीगमध्येही भारतीय महिला संघ आपली छाप पाडत आहे. भारतीय खेळाडूंनी बिग बॅश लीग, द हंड्रेडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारतात महिलांसाठी आयपीएलसारखी (IPL) स्पर्धा असावी अशी चर्चा होत असते. पुरुषांच्या आयपीएलबरोबरच बीसीसीआय महिला चॅलेंजर नावाची स्पर्धा आयोजित करत असली तरी ती फक्त चार संघांची आहे. देशातील महिला आयपीएलबाबत भारतीय खेळाडूंनीही सातत्याने आवाज उठवला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी सांगितले की, बोर्ड महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्टाईल लीग आणण्यावर आम्ही काम करत आहोत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “महिला टी-20 चॅलेंजमध्ये चाहत्यांनी महिला संघाच्या कामगिरीचे भरभरुन कौतुक केले होते. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आपल्या सर्वांना हवी आहे. परंतु तीन-चार संघ एकत्र करुन महिलांची आयपीएल सुरु करावी, असे नाही.

अनेक गोष्टी महत्त्वाच्या

शाह पुढे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्टार्सची उपलब्धता, दोन बोर्डांमधील द्विपक्षीय करार यासारखे अनेक घटक महत्त्वाचे आहेत. आम्ही सर्व पर्याय पाहत आहोत. तसेच भविष्यात आम्ही महिला खेळाडूंसाठी अशाच प्रकारच्या लीग आयोजित करण्यावर काम करत आहोत. स्मृती मानधना (Smriti Manadhana) आणि हरमनप्रीत कौर सारख्या खेळाडूंनी भारताची स्वतःची महिला लीग असावी आणि त्याचा देशाच्या क्रिकेटला कसा फायदा होईल याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

या खेळाडूंचे कौतुक करा

शाह यांनी परदेशी टी-20 लीगमध्ये भारताच्या उर्वरित खेळाडूंचे कौतुक केले आहे. तो म्हणाले, “आयपीएलसारख्या लीगमध्ये आमच्या खेळाडूंना निश्चितच मदत होईल कारण यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. स्मृती आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त भारताच्या उर्वरित खेळाडूंनीही परदेशी टी-20 लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. द हंड्रेड आणि डब्ल्यूबीबीएलमध्ये, दीप्ती शर्मा, जेमिहा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा आणि पूनम यादव यांनी विदेशी लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्या देशातील महिला क्रिकेटप्रेमींसाठी रोल मॉडेल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT