Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Catch: विराटची सुपर फिल्डिंग! सूर मारत एका हाताने घेतलेल्या कॅचने आख्खं मैदान चकीत

Video: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत रविंद्र जडेजाच्या बॉलिंगवर विराट कोहलीने घेतलेल्या एकहाती कॅचने अनेकांना चकीत केले.

Pranali Kodre

Virat Kohli One-handed stunning catch: गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोसमधील ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. याबरोबरच विराट कोहलीने घेतलेल्या एका झेलानेही सर्वांची वाहवा मिळवली.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा भारतीय गोलंदाजांनी चांगला फायदा उचलला. यादरम्यान 18 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विराटने वेस्ट इंडिजच्या रोमारियो शेफर्डचा शानदार एकहाती झेल घेतला.

झाले असे की 18 व्या षटकात जडेजाने फुल लेंथवर चौथा चेंडू टाकला. त्याच्या या चेंडूवर शेफर्डने पुढे येऊन लाँग ऑफला शॉटवर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन मागे गेला.

यावेळी दुसऱ्या स्लीपमध्ये विराट कोहली क्षेत्ररक्षण करत होता. त्याने त्याच्या उजव्या बाजूला सूर मारत एका हाताने झेल पकडला. त्याचा हा झेल पाहून शेफर्डसह भारतीय खेळाडूही चकीत झाले. पण त्याने झेल घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. शेफर्ड भोपळाही न फोडला शुन्यावर बाद झाला.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकातच 114 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 22.5 षटकात पूर्ण केला. भारताकडून इशान किशनने 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 19 धावा, रविंद्र जडेजाने नाबाद 16 धावा आणि रोहित शर्माने नाबाद 12 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिल (7), हार्दिक पंड्या (5) आणि शार्दुल ठाकूर (1) स्वस्तात बाद झाले.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT