West Indies vs India Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, ODI: भारत-वेस्ट इंडिजमध्ये आता वनडे मालिकेचा थरार! केव्हा अन् कुठे पाहाणार मॅच, घ्या जाणून

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज संघात 27 जुलैपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, ODI Series Live Streaming Details: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेली 2 सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज संघात 27 जुलैपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. वेस्ट इंडिजचा संघ आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर आता भारताविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी उत्सुक असेल. तसेच भारतीय संघासाठी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे, तर हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. तसेच भारताच्या वनडे संघात सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव अशा खेळाडूंचाही समावेश आहे.

तसेच वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व शाय होप करेल. याबरोबरच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल. वेस्ट इंडिजच्या वनडे संघात ओशान थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, निकोलस पूरम आणि जेसन होल्डर या मालिकेसाठी अनुपलब्ध असणार आहेत.

केव्हा आणि कुठे होणार मालिका

27 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि भारत संघात सुरु होणाऱ्या तीन सामन्यांची वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 27, 29 आणि 1 जुलै रोजी पार पडणार आहे. पहिले दोन सामने बार्बाडोसला आणि अखेरचा सामना त्रिनिदादला होणार आहे.

वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. या मालिकेतील सामने भारतीय चाहत्यांना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहाता येणार आहेत. तसेच या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा आणि फॅनकोड ऍपवरही करण्यात येणार आहे.

आमने-सामने कामगिरी

भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत 139 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 70 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवले आहेत. तसेच 63 सामन्यात वेस्ट इंडिज संघ विजेता झाला आहे. 2 सामने बरोबरीत सुटलेत, तर 4 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

दरम्यान, भारतीय संघ गेल्या जवळपास 15-16 वर्षापासून वेस्ट इंडिजवर वर्चस्व राखून आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध अखेरची वनडे मालिका 2006 साली जिंकली होती. त्यानंतर त्यांना भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकता आलेली नाही.

असे आहेत दोन्ही संघ -

  • वेस्ट इंडिजचा वनडे संघ - शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक अथानाझ, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सिल्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉमस

    सराव शिबिरातील अतिरिक्त खेळाडू: डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅककेनी क्लार्क, कावेम हॉज, जेर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम.

  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT