Kuldeep Yadav and Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

India vs West Indies: जड्डू-कुलदीपची जोडी बनली नंबर वन! भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम

Kuldeep Yadav and Ravindra Jadeja: रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या जोडीने भारतीय क्रिकेटमध्ये खास विक्रमाची नोंद केली आहे.

Pranali Kodre

Kuldeep Yadav and Ravindra Jadeja pair Record: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात गुरुवारी (27 जुलै) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसला पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी गोलंदाजी करताना महत्त्वाची कामगिरी बजावली.

या सामन्कुलदीपने 3 षटके गोलंदाजी करताना केवळ 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर जडेजाने 6 षटकांमध्ये 37 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा डाव 23 षटकातच 114 धावांवर संपुष्टात आणला.

दरम्यान, कुलदीप आणि जडेजा हे दोघेही डावखुरे फिरकीपटू आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. भारतीय डावखुरे फिरकीपटू म्हणून एकत्र एका वनडे सामन्यात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारी त्यांची पहिलीच जोडी ठरली. यापूर्वी भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटूंना एकत्र एकाच वनडेत 7 विकेट्स घेता आल्या नव्हत्या.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, कुलदीप आणि जडेजाव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच ऍलिक अथानाझने 22 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून कोणीही 20 धावांचा टप्पा ओलांडला नाही.

त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल केले होते. पण भारताने इशान किशनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजयाला गवसणी घातली. इशानने सलामीला फलंदाजी करताना 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली.

तसेच सूर्यकुमार यादवने 19, रविंद्र जडेजाने नाबाद 16 आणि रोहित शर्माने नाबाद 12 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिल (7), हार्दिक पंड्या (5) आणि शार्दुल ठाकूर (1) स्वस्तात बाद झाले.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT