India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd ODI: दुसऱ्या वनडेतून रोहित-विराट बाहेर, तर सॅमसनला संधी! अशी आहे भारताची Playing XI

India vs West Indies: शनिवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतून रोहित आणि विराट यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले आहे.

Pranali Kodre

West Indies vs India 2nd ODI Playing XI: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) खेळवला जात आहे. हा सामना बार्बाडोस येथील ब्रिजटाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या करणार आहे. भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. याबद्दल प्रभारी कर्णधार हार्दिकने नाणेफेकवेळी सांगितले की हे दोघेही सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

विराट आणि रोहित यांच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. वेस्ट इंडिजने रोवमन पॉवेल आणि डॉमिनिक ड्रेक्सला वगळून अल्झारी जोसेफ आणि केसी कार्टी यांना संधी दिली आहे.

दरम्यान हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तसेच वेस्ट इंडिजही हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधून आपले आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना ५ विकेट्सने जिंकला आहे.

अशी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -

  • वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथनाझ, शाय होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

  • भारत: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT