West Indies  Dainik Gomantak
क्रीडा

Video: निराशा अन् फक्त निराशा! World Cup मधून पहिल्यांदाच बाहेर गेल्यानंतर वेस्ट इंडिज खेळाडू इमोशनल

West Indies Cricket: भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून वेस्ट इंडिज बाहेर गेल्यानंतर आजी-माजी खेळाडू भावूक झाले होते.

Pranali Kodre

West Indies Team Emotional After Exit from World Cup 2023: भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. 10 संघात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 8 संघांनी थेट पात्रता मिळवली आहे. मात्र दोन संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेतून पात्र ठरणार आहेत.

दरम्यान, या क्वालिफायर स्पर्धेत दोन वेळचा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिजही खेळत आहे. पण क्वालिफायरमध्येही त्यांना फार काही करता आलेले नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजवर वर्ल्डकप 2023 च्या मुख्य स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली.

शनिवारी (1 जुलै) वेस्ट इंडिज संघाला क्वालिफायर स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत स्कॉटलंडने 7 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर आता सुपर सिक्समध्ये वेस्ट इंडिज जास्तीत जास्त केवळ 4 गुणच मिळवू शकतात. पण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचे यापूर्वीच 6 गुण झालेले असल्याने वेस्ट इंडिजला बाहेर जावे लागले.

त्यामुळे स्कॉटलंडविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, तसेच समालोचन करणारे माजी वेस्ट इंडिजचे खेळाडू सर्वच जण निराश दिसत होते.

कारण वनडे इतिहासातील पहिले दोन वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळताना दिसणार नाही. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या पराभवानंतरच्या क्षणांचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान गेल्या 7 वर्षात वेस्ट इंडिजची आयसीसीच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी 2017 साली चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठीही वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरला नव्हता. याशिवाय 2022 टी20 वर्ल्डकपमध्येही सुपर 12 फेरीसाठी वेस्ट इंडिज संघ पात्र ठरला नव्हता.

वेस्ट इंडिजला क्विलिफायर स्पर्धेत अमेरिका आणि नेपाळविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मात्र सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले. त्यांना झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि नंतर स्कॉटलंड विरुद्धही पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सविरुद्ध तर वेस्ट इंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर आता स्कॉटलंडने शनिवारी वेस्ट इंडिजला पराभूत करण्याबरोबरच मुख्य स्पर्धेच्या शर्यतीतूनही बाहेर केले. शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकात सर्वबाद 181 धावा करता आल्या. त्यानंतर 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग स्कॉटलंडने  43.3 षटकात 3 बाद 185 धावा करत सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT