West Indies Dainik Gomantak
क्रीडा

West Indies: हिरो से झिरो! माजी विश्वविजेते वर्ल्डकपमधून बाहेर! स्कॉटलंडकडून मानहानीकारक पराभव

West Indies Cricket: माजी विश्वविजेते वेस्ट इंडिजवर वर्ल्डकप 2023 मधून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे.

Pranali Kodre

West Indies out of ICC Cricket World Cup 2023: झिम्बाब्वेमध्ये सध्या वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत शनिवारी (1 जुलै) वेस्ट इंडिज संघाला स्कॉटलंडने 7 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे वेस्ट इंडिजवर 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकप 2023 च्या मुख्य स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे.

वनडे इतिहासातील पहिले दोन वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळताना दिसणार नाही. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा क्वाईव्ह लॉयड यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती.

त्यानंतर त्यांना विश्वविजेतेपद जिंकता आले नाही. पण ते आत्तापर्यंत झालेल्या सर्व 12 वर्ल्डकपमध्ये खेळले. मात्र, आता 13 व्या वनडे वर्ल्डकपमध्ये ते खेळू शकणार नाहीत.

वेस्ट इंडिजला या वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यामुळे त्यांना क्वालिफायर खेळावे लागले. पण क्वालिफायरमध्येही त्यांना फार चांगली कामगिरी करता आली नाही.

शनिवारी स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे आता सुपर सिक्समध्ये वेस्ट इंडिज जास्तीत जास्त केवळ 4 गुणच मिळवू शकतात. पण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचे यापूर्वीच 6 गुण झालेले असल्याने वेस्ट इंडिजला बाहेर जावे लागले. दरम्यान स्कॉटलंडचा हा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेट इतिहासातील पहिलाच विजय ठरला आहे.

या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजीसाठी उतरले. पण वेस्ट इंडिजला 43.5 षटकात सर्वबाद 181 धावा करता आल्या.

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तसेच रोमारिओ शेफर्ड यांनी 36 धावांची खेळी केली. याशिवाय कोणाला खास काही करता आले नाही. स्कॉटलंडकडून ब्रेंडन मॅकम्युलनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस सोल, मार्क बॅट आणि ख्रिस ग्रिव्ह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच सफायन शरिफन 1 विकेट घेतली.

त्यानंतर 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर स्कॉटलंडने सलामीवीर ख्रिस्तोफर मॅकब्राईडची विकेट गमावली होती. पण नंतर मॅथ्यू क्रॉस आणि ब्रेंडन मॅक्युमिलन यांनी 125 धावांची भागीदारी करत स्कॉटलंडच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनीही अर्धशतके केली. त्यामुळे स्कॉटलंडने 43.3 षटकात 3 बाद 185 धावा करत सहज विजय मिळवला.

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

SCROLL FOR NEXT