Weightlifting competition Dainik Gomantak
क्रीडा

Weightlifting Gold Medal : वेटलिफ्टिंग स्पर्धेत ; पंजाबची हरजिंदर, राजस्थानचा निकेत यांना सुवर्णपदक

वेटलिफ्टिंगमध्ये शुक्रवारी पुरुषांच्या ८१ किलो वजनगटात राजस्थानच्या निकेत जांगिड याने, तर महिलांच्या ७१ किलो वजनगटात पंजाबच्या हरजिंदर कौर हिने सुवर्णपदक जिंकले.

गोमन्तक डिजिटल टीम

Weightlifting Gold Medal : पणजी, गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये शुक्रवारी पुरुषांच्या ८१ किलो वजनगटात राजस्थानच्या निकेत जांगिड याने, तर महिलांच्या ७१ किलो वजनगटात पंजाबच्या हरजिंदर कौर हिने सुवर्णपदक जिंकले.

स्पर्धा कांपाल येथील क्रीडानगरीत सुरू आहे. महिलांच्या ७१ किलो वजनगटात महाराष्ट्राची तृप्ती माने रौप्यपदकाची मानकरी ठरली. एकूण १९० किलो वजन उचलले, तर सुवर्णपदक विजेत्या हरजिंदरने एकूण २०१ किलो वजन उचलून अव्वल क्रमांक मिळविला.

ब्राँझपदक विजेत्या मणिपूरच्या पोत्शांगबाम उमेश्वरी देवी हिला एकूण १८९ किलो वजन उचलणे शक्य झाले.

पुरुषांच्या ८१ किलो वजन गटात सुवर्णपदक विजेत्या निकेत याने एकूण ३१७ किलो वजन उचलले. मध्य प्रदेशच्या वाल्लुरी अजय बाबू याने एकूण ३१२ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. तर महाराष्ट्राच्या अभिषेक निपाणे याने एकूण ३०९ किलो वजन उचलून ब्राँझपदक प्राप्त केले.

पुुरुषांच्या ८९ किलो वजन गटात केवळ दोन किलोंच्या फरकाने तिन्ही पदके निश्चित झाली. चंडीगडच्या गौरव याने ३१९ किलोंसह सुवर्णपदक मिळविले.

सेनादलाच्या पी.एस मरुष याला ३१८ किलोंसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पंजाबच्या अमरजित गुरू याला ३१७ किलोंसह ब्राँझपदक मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT