Jason Holder Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: जेसन होल्डर म्हणाला, 'भारताला आम्ही त्यांच्या होम ग्राऊंडवर हरवू'

दैनिक गोमन्तक

जगातील नंबर वन टी-20 संघाला हरवणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. मग वेस्ट इंडिजने स्वतःच्या घरच्या मैदानावर हे का केले नाही? आता अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. विशेषत: ज्या खेळाडूने इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने असा करिष्मा केला, जो वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणीही केला नव्हता. इंग्लंडविरुद्ध 15 विकेट्स घेऊन T20 मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनलेला जेसन होल्डर भारताला आता त्यांच्याच मैदानावर इंगा दाखवणार आहे. भारतात येण्यापूर्वी होल्डरने (Jason Holder) मोठे वक्तव्य केले आहे. 6 फेब्रुवारीला पहिला एकदिवसीय सामना भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात होणार आहे. (We Will Beat India At Their Home Ground Said Jason Holder)

भारताला घरच्या मैदानावर हरवू - जेसन होल्डर

भारताला रवाना होण्यापूर्वी होल्डरने वेस्ट इंडिजमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले, मला वाटते की ही एक मोठी मालिका असणार आहे. माझ्यासाठी भारत हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. गेल्या 2 वर्षातील कामगिरीने आम्ही स्वत:ला सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत भारताला त्यांच्याच होम टाऊनमध्ये पराभूत करणे सोपे नाही. पण हे काम अवघडही नाही. वेस्ट इंडिज संघात इतकी ताकद आहे की, भारताला त्यांच्याच भूमीवर हरवू आम्ही शकतो.

पोलार्डने होल्डरप्रमाणे गर्जना केली

होल्डरप्रमाणेच वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कैरन पोलार्डही (Kieron Pollard) इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर भारतात चांगली कामगिरी करण्याबाबत बोलला आहे. पोलार्डच्या मते, रोहित शर्मा एक अप्रतिम कर्णधार आहे, ज्याच्याविरुद्ध क्रिकेट खेळणे अवघड असणार आहे. तो पुढे म्हणाला, आम्ही इंग्लंडमध्ये मोठा विजय नोंदवला आहे. आता आमची नजर भारताविरुध्द मालिका जिंकण्यावर असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT