Pakistani Player Wasim Akram Twitter
क्रीडा

Wasim Akram: वसीम अक्रम म्हणतो वन डे क्रिकेट बंद करा

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम (Wasim Akram) याने आंतरराष्ट्रिय क्रिकेट (One Day Cricket) बंद करावे अशी मागणी केली आहे. वन डे क्रिकेट खूप थकवणारे असून, T20 हा अधुनिक प्रकार आता जास्त स्विकारला जात आहे. असे वसीम अक्रम म्हणाला आहे. भारतील संघासोबत झालेल्या मालिकेनंतर इंग्लंडचा धडाडीचा खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stocks) याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अक्रमने आपले मत मांडले आहे.

वसीम अक्रम म्हणाला, 'बेन स्टोक्सचा निवृत्तीचा निर्णय अतिशय दुःखद आहे, पण मी त्याच्याशी सहमत आहे. मला खेळाडूची अवस्था समजू शकते. 50 षटकांच्या सामन्यात, पहिला सामना खेळ्यानंतर पुन्हा 50 षटके, नंतर प्री-गेम, पोस्ट-गेम करावे लागते. त्याच्या तुलनेत T20 खूप सोपा असून, चार तासांत खेळ पूर्ण होतो. T20 आधुनिक क्रिकेटचा प्रकार असून, त्यात भरपूर पैसाही आहे.'

पूर्ण दिवस चालणारा वन डे क्रिकेटचा प्रकार खूप थकवणारे आहे. त्यामुळे शॉर्ट फॉरमॅट असलेल्या T20 क्रिकेटकडे खेळाडू जास्त आकर्षित होत आहेत. मी नेहमीच कसोटी क्रिकेटला (Test Cricket) प्राधान्य दिले आहे. एकदिवसीय क्रिकेट सुद्धा मजेदार होते पण, कसोटी क्रिकेटमुळे खेळाडूला खरी ओळख मिळते. असे वसीम अक्रम म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT