Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL 3rd T20 Match: कर्णधार पांड्याने 'या' खेळाडूची केली निराशा, तिसऱ्या टी-20 मध्ये...!

IND vs SL 3rd T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जात आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs SL 3rd T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया या सामन्यात कोणताही बदल न करता खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत पांड्याने एकाही मोठ्या खेळाडूला एकही सामना खेळण्याची संधी न देता सर्वांनाच चकित केले. हा खेळाडू गोलंदाजीसोबतच बॅटने तूफान फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो.

या खेळाडूला संधी मिळायला हवी होती

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) या T20 मालिकेत कर्णधार हार्दिक पांड्याने अक्षर पटेलला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी अष्टपैलू म्हणून संधी दिली. त्यामुळे स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेत एकही सामना खेळू शकला नाही. गेल्या काही काळापासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यात तो सातत्याने यशस्वी होत आहे. तो किफायतशीर गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही योगदान देतो, पण या मालिकेत तो बेंचवर बसलेला दिसला.

टीम इंडियाची आतापर्यंतची आकडेवारी

वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी (Team India) तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 4 कसोटी सामन्यात 265 धावा आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 12 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामनेही खेळले गेले आहेत. या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 212 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचवेळी, T20 सामन्यांमध्ये सुंदरने मीडिल ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना 47 धावा आणि गोलंदाजीत 26 विकेट्स घेतल्या आहेत. पांड्याच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंड दौऱ्यावर शेवटचा टी-20 सामना खेळला.

शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग-11

भारत (प्लेइंग-11): ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि यजुवेंद्र चहल.

श्रीलंका (प्लेइंग 11): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ अस्लंका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षना, कासून रजिथा आणि दिलशान मदुशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT