Joe Allen Dainik Gomantak
क्रीडा

Joe Allen: वयाच्या 32 व्या वर्षीच लिव्हरपूलच्या माजी फुटबॉलरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

वेल्सच्या 32 वर्षीय स्टार फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Joe Allen: वेल्सचा स्टार फुटबॉलपटू जो ऍलेन याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून मंगळवारी निवृत्ती जाहीर केली आहे. या 32 वर्षीय फुटबॉलपटूने दुखापतींचा मुद्दा लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तो क्लब फुटबॉल खेळत राहिल.

ऍलेन याने निवृत्ती घेताना म्हटले की 'वेल्ससाठी खेळणे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि जिद्द होती. मला खेळायला मिळाले याबद्दल मी खूप भाग्यशाली आहे. 'मला खूप चांगल्या लोकांबरोबर जसे की माझे कुटुंब, संघसहकारी, स्टाफ आणि चाहत्यांबरोबर हा प्रवास करता आला. त्यांनी हा प्रवास खास बनवला आणि मी याबद्दल कृतज्ञ आहे.'

'आपल्या देशाकडून मिळालेला पाठिंबा प्रेरणादायी आहे. वेल्सची जर्सी घालणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होते. मी खूप अविस्मरणीय अनुभव घेतले आहेत. पण, दुर्दैवाने वेळ आणि दुखापतींनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की मी पुढील पिढीसाठी मार्ग मोकळा करावा.'

ऍलेन हा वेल्स संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. वेल्सकडून 2022 वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणारा तो दुसरा स्टार खेळाडू आहे. त्याच्याआधी गेल्या महिन्यात गॅरेथ बेलने निवृत्तीची घोषणा केली होती.

लिव्हरपूलचा माजी खेळाडू ऍलेन याने 2009 साली वेल्सकडून पदार्पण केले होते. त्याने संघाला तीन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी पात्र ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 58 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर युरो 2016 स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आणि उपांत्य फेरीपर्यंत पोहचलेल्या वेल्स संघाचाही तो भाग होता.

(Wales midfielder Joe Allen retired from international football)

तसेच त्याने वेल्सला युरो 2020 स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. तसेच त्याने वेल्सला कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यासाठीही महत्त्वाचे योगदान दिले होते. महत्त्वाचे म्हणजे 1958 नंतर पहिल्यांदा वेल्स वर्ल्डकपसाठी पात्र ठरले होते.

मात्र या वर्ल्डकपदरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, त्याने या वर्ल्डकपमध्ये वेल्सच्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. मात्र आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने वेल्सकडून 74 सामने खेळले आहेत. तसेच सध्या तो क्लब फुटबॉल स्वान्सी एफसीकडून खेळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT